काश्मीर, झारखंडमध्ये 5 टप्प्यांत निवडणूक
By Admin | Updated: October 26, 2014 02:23 IST2014-10-26T02:23:55+5:302014-10-26T02:23:55+5:30
जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला असून, येथे येत्या 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर यादरम्यान पाच टप्प्यांत मतदान होणार आह़े

काश्मीर, झारखंडमध्ये 5 टप्प्यांत निवडणूक
लढाई विधानसभेची : 23 डिसेंबरला मतमोजणी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला असून, येथे येत्या 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर यादरम्यान पाच टप्प्यांत मतदान होणार आह़े 23 डिसेंबरला मतमोजणी पार पडेल़
मुख्य निवडणूक आयुक्त व्ही़ एस़ संपत यांनी आज शनिवारी जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यांतील निवडणूक तारखांची घोषणा केली़ दोन्ही राज्यांत 25 नोव्हेंबरला मतदानाचा पहिला टप्पा पार पडेल़यानंतर 2 डिसेंबरला दुस:या, 9 डिसेंबरला तिस:या, 14 डिसेंबरला चौथ्या आणि 2क् डिसेंबर पाचव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान पार पडेल़ 23 डिसेंबरला मतमोजणी होईल, असे त्यांनी जाहीर केल़े निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, आजपासून दोन्ही राज्यांत निवडणूक आचारसंहिता लागू झाली आह़े जम्मू -काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ 19 जानेवारीला संपत असून, 81 सदस्यीय झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 3 जानेवारीला संपतो आह़े
दरम्यान, जम्मू-काश्मिरातील महापुराच्या संकटामुळे राज्यातील निवडणुकांवर फार विशेष परिणाम संभवत नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले असतानाच राज्यातील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सने मात्र निवडणूक तारखांबाबत तीव्र आक्षेप नोंदवला आह़े दुसरीकडे पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी), भाजपा आणि काँग्रेसने आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले आह़े महापूर आणि यामुळे झालेला विध्वंस या पाश्र्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुका लांबणीवर टाकण्याची विनंती सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सने केली होती़ तथापि निवडणूक आयोगाने नियोजित कार्यक्रमानुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला़ पीडीपी, माक्सर्वादी कम्युनिस्ट पार्टी(माकपा)चे नेते मोहंमद युसूफ तारगामी आणि भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांनी आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केल़े भाजपा सुशासन, विकास आणि सुरक्षा या मुद्दय़ावर निवडणुका लढेल आणि बहुमताने जिंकेल, असा विश्वास नकवींनी व्यक्त केला़(लोकमत न्यूज नेटवर्क)
दिल्लीत पोटनिवडणुका
दिल्ली विधानसभेच्या महरौली, तुघलकाबाद आणि कृष्णानगर या तीन जागांसाठीही 25 नोव्हेंबरलाच पोटनिवडणूक घेतली जाणार आह़े लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने या तीन जागांवरील आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता़
कुणाचे राजकीय पुनर्वसन करण्याआधी जम्मू-काश्मिरातील पूरग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे, असे माङो व माङया पक्षाचे मत होत़े पण निवडणूक आयोगाचे मत यापेक्षा वेगळे होत़े आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आह़े निवडणुका न लढण्याचा प्रश्नच नाही़ त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्स सकारात्मकपणो या निवडणुकीस सामोरे जाईल़
- ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर