दिल्लीत निवडणुका अटळ

By Admin | Updated: November 4, 2014 03:27 IST2014-11-04T03:27:39+5:302014-11-04T03:27:39+5:30

दिल्लीत विधानसभा निवडणुका घेण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही. निवडणूक आयोग पुढील वर्षी जानेवारीत राजधानीत निवडणुका घेण्याची शक्यता आहे.

Elections in Delhi are inevitable | दिल्लीत निवडणुका अटळ

दिल्लीत निवडणुका अटळ

शीलेश शर्मा, नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप आणि बिगर भाजपा पक्षांनी घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर आता नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यासमोर दिल्लीत विधानसभा निवडणुका घेण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही. निवडणूक आयोग पुढील वर्षी जानेवारीत राजधानीत निवडणुका घेण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील राष्ट्रपती राजवटीची मुदत फेब्रुवारीत संपणार आहे. तथापि अंतिम निर्णय घेण्याआधी सर्व पर्याय तपासण्याचा जंग यांचा प्रयत्न आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जंग यांनी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला त्या वेळी भाजपा आपले अल्पमताचे सरकार बनविण्यासाठी उतावीळ होती.
परंतु ७० सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेला ३६ चा जादूई आकडा जमविणे अशक्य आहे, हे लक्षात आल्यावर भाजपाला जबर धक्का बसला. त्यामुळे आता त्यांना निवडणुकांना सामोरे जावे लागेल.

Web Title: Elections in Delhi are inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.