दिल्लीत पुन्हा निवडणुका ?

By Admin | Updated: October 29, 2014 17:51 IST2014-10-29T17:15:26+5:302014-10-29T17:51:04+5:30

सत्तास्थापनेविषयी तातडीने निर्णय झाला नाही तर केंद्रीय गृहमंत्रालय दिल्लीत पुन्हा निवडणूक घेण्याचे निर्णय घेईल असे संकेत वरिष्ठ अधिका-यांनी दिले आहे.

Elections in Delhi again? | दिल्लीत पुन्हा निवडणुका ?

दिल्लीत पुन्हा निवडणुका ?

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - सत्तास्थापनेविषयी तातडीने निर्णय झाला नाही तर केंद्रीय गृहमंत्रालय दिल्लीत पुन्हा निवडणूक घेण्याचे निर्णय घेईल असे संकेत वरिष्ठ अधिका-यांनी दिले आहे. उप राज्यपाल नजीब जंग यांनी सत्तास्थापनेविषयीचा अंतिम अहवाल दिल्यावरच याविषयीचा अंतिम निर्णय घेतला जाईल असे अधिका-यांनी सांगितले. 
फेब्रुवारीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यासापासून दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू आहे. जवळपास नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी दिल्लीकरांना मुख्यमंत्री मिळालेला नाही. यावरुन सुप्रीम कोर्टानेही केंद्र सरकारला फटकारले आहे. यापार्श्वभूमीवर उप राज्यपाल नजीब जंग राज्यातील सर्व पक्षांशी चर्चा करुन सत्ता स्थापनेला संधी आहे का याचा आढावा घेणार आहेत. चर्चेनंतर उप राज्यपाल केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल देतील. या अहवालात कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेची तयारी दर्शवली नाही तर गृहमंत्रालय दिल्लीत पुन्हा निवडणूक घेण्याचे निर्देश देईल अशी माहिती एका वरिष्ठ एका वरिष्ठ अधिका-याने दिली. दरम्यान, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी नजीब जंंग यांच्यावर भाजपाचे एजंट असल्याचा आरोप केला आहे. 

Web Title: Elections in Delhi again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.