शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये कधीही होऊ शकतात निवडणुका, अधिकार आयोगाला; राज्य दर्जाला वेळ लागेल : केंद्राचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 07:07 IST

राज्यात तीन पातळ्यांवर निवडणुका होतील - पंचायत निवडणुका,  नगरपालिका निवडणूक आणि विधानसभा स्तरावरील निवडणुका.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये कधीही निवडणुका होऊ शकतात आणि निवडणूक आयोगाला या मुद्द्यावर निर्णय घ्यायचा आहे, पूर्ण राज्याचा दर्जा पुनर्स्थापित करण्यास मात्र वेळ लागेल, असे स्पष्टीकरण केंद्रशासित प्रदेशात लोकशाही आणि पूर्ण राज्याचा दर्जा प्रस्थापित करण्याचा आराखडा सादर करताना सरकारने सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी दिले.राज्यात तीन पातळ्यांवर निवडणुका होतील - पंचायत निवडणुका,  नगरपालिका निवडणूक आणि विधानसभा स्तरावरील निवडणुका. कोणत्या निवडणुका आधी घ्यायच्या आणि कशा घ्यायच्या याचा निर्णय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला घ्यायचा आहे. मतदार यादी नूतनीकरण जवळपास पूर्ण झाले आहे आणि एका महिन्यात ते काम पूर्ण होईल.

दहशतवाद, घुसखोरीत घट२०१८ च्या तुलनेत दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये ४५.२ टक्क्यांनी घट झाली आहे. घुसखोरी ९०.२ टक्क्यांनी कमी झाली. २०१८ मध्ये दगडफेक आणि आंदोलनाच्या घटना १७६७ होत्या, त्या आता शून्य आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण ६०.९ टक्क्यांनी कमी झाले.फुटीरतावादी गटांनी आयोजित केलेल्या बंदचे प्रमाण २०१८ मधील ५२ टक्क्यांवरून २०२३ मध्ये शून्यावर आले आहे, असे मेहता म्हणाले. 

केंद्राच्या आकडेवारीची नोंद घेऊ नका : कपिल सिब्बलनॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोहम्मद अकबर लोन यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकारच्या आकडेवारीवर खंडपीठाने आक्षेप घेतला आणि म्हटले की तिची नोंद घेऊ नये कारण त्याचा कलम ३७० च्या घटनात्मक मुद्द्याला न्याय देत असलेल्या न्यायालयाच्या मतावर परिणाम होईल.

घटनात्मक मुद्द्यांवर परिणाम नाहीसरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सिब्बल यांना आश्वासन दिले की, सॉलिसिटर जनरल यांनी दिलेल्या आकडेवारीचा पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाद्वारे निर्णय घेतल्या जाणाऱ्या घटनात्मक मुद्द्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

चेंडू आयोगाच्या कोर्टात : सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाला सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाने घ्यायचा आहे. 

जम्मू-कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्यासाठी नेमकी कालमर्यादा या क्षणी सांगता येणार नाही. यास थोडा वेळ लागू शकतो. त्यासाठी विविध पावले उचलली जात आहेत.    - तुषार मेहता,     सॉलिसिटर जनरल

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयJammu Kashmirजम्मू-काश्मीर