मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामधील मतदानाच्या तारखा जाहीर, निवडणूक आयोगाने केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 12:37 PM2018-01-18T12:37:30+5:302018-01-18T12:49:14+5:30

निवडणूक आयोगाने गुरुवारी मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या ईशान्येकडच्या तीन राज्यांमधील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले.

Elections announced in Meghalaya, Nagaland and Tripura, Election Commission announced | मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामधील मतदानाच्या तारखा जाहीर, निवडणूक आयोगाने केली घोषणा

मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामधील मतदानाच्या तारखा जाहीर, निवडणूक आयोगाने केली घोषणा

Next

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने गुरुवारी मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या ईशान्येकडच्या तीन राज्यांमधील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारीला तर मेघालया आणि नागालँड या दोन राज्यात 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यांमधील मतमोजणी 3 मार्चला होईल. मुख्य निवडणूक आयुक्त एके जोती यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. 

आजपासूनच या तिन्ही राज्यांमध्ये आदर्श अचारसंहिता लागू झाली आहे. मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामध्ये मिळून विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. 

मेघालय विधानसभेची मुदत 6 मार्च, नागालँड विधानसभेची मुदत 13 मार्च आणि त्रिपुराची विधानसभेची मुदत 14 मार्चला संपत आहे. निवडणूक आयोगाने उशिरानेच तारखा जाहीर केल्या आहेत. 2013 साली 11 जानेवारीला निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. 

Web Title: Elections announced in Meghalaya, Nagaland and Tripura, Election Commission announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.