८३ ग्रा.पं.मध्ये १३९ पदांसाठी निवडणूक रणगाव येथे सार्वत्रिक निवडणूक : २५ पासून निवणुक प्रक्रिया सुरु
By Admin | Updated: July 23, 2016 00:03 IST2016-07-23T00:03:05+5:302016-07-23T00:03:05+5:30
जळगाव : डिसेंबर महिन्यात मुदत संपणार्या रणगाव ता.रावेर या ग्रामपंचायतीसह ८३ ग्रामपंचायतींमधील १३९ रिक्त सदस्यपदांसाठी पोटनिवडणुक होत आहे. २५ पासून निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

८३ ग्रा.पं.मध्ये १३९ पदांसाठी निवडणूक रणगाव येथे सार्वत्रिक निवडणूक : २५ पासून निवणुक प्रक्रिया सुरु
ज गाव : डिसेंबर महिन्यात मुदत संपणार्या रणगाव ता.रावेर या ग्रामपंचायतीसह ८३ ग्रामपंचायतींमधील १३९ रिक्त सदस्यपदांसाठी पोटनिवडणुक होत आहे. २५ पासून निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.८३ ग्रा.पं.मध्ये पोटनिवडणुकजिल्हा प्रशासनातर्फे ८३ गावांमध्ये रिक्त असलेल्या १३९ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणुक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यात जळगाव तालुका : विटनेर, आसोदा, फुपणी, कंडारी, सावखेडा. जामनेर : शेरी, लहासर, शहापूर, किन्ही, डोहरी. एरंडोल : धारागिर, टोळी खुर्द, ब्रााणे. भुसावळ : कठोरा बुद्रुक, अंजनसोंडे, चोरवड, बेलव्हाय. यावल : म्हैसवाडी, बोरखेडा बुद्रुक, बोरावल बुद्रुक, शिरागड, विरोदा, भालशिव, न्हावी प्र.अ., पिळोदे खुर्द, बामणोद, नावरे, टाकरखेडा, पिंप्री. रावेर : रणगाव येथे सार्वत्रिक निवडणुक तर शिंगाडी, कांडवेल, नेहते, धुरखेडा, थोरगव्हाण, तासखेडा, मोरगाव खुर्द, दोधे, गहुखेडा, कोळोदे, पुनखेडा, पाडळे खुर्द, रायूपर, सहस्त्रलिंग, पुरी गोलवाडे, खानापूर, मस्कावद खुर्द, कुसुंबा बुद्रुक, भोकरी, मांगी/चुनवाडे येथे पोटनिवडणुक होणार आहे. चोपडा : धुपे बुद्रुक, गणपूर, अंबोडे, विचखेडा, अंजतीसिम. भडगाव : कनासी, अंजनविहिरे, कोळगाव, तांदुळवाडी, वाक, भगाव, वडगाव बुद्रुक. पाचोरा : खडकदेवळा, टाकळी, डोकलखेडा, भोरटेक. चाळीसगाव : दसेगाव बुद्रुक, आडगाव, राजदेहरे. अमळनेर : सडावण बुद्रुक, जैतपीर, रुंधाटी, भिलाली, खेडी खुर्द, कळमसरे, कंडारी खुर्द, एकतास, धावडे, निमचारम, शिरूर, तांदळी, नगाव बुद्रुक, सुंदरपी. बोदवड : करंजी. या गावांचा समावेश आहे.२५ पासून निवडणुक प्रक्रियाग्रामपंचायत निवडणुकीसाठी २५ जुलैपासून प्रक्रिया सुरु झाली आहे. ३ ते ९ ऑगस्ट दरम्यान नामनिर्देशनपत्रे मागविण्यात येणार आहे. १० रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. १२ ऑगस्ट रोजी अर्ज माघार होणार आहे. १२ ऑगस्ट रोजी चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.२४ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.२६ रोजी मतमोजणीची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. २९ ऑगस्ट रोजी निकाल प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख असणार आहे. निवडणुक लागू झालेल्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.