शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील भाजी विक्रेत्याच्या मुलाला भाजपाची उमेदवारी; 'या' जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 10:59 IST

हमीरपूर पोटनिवडणुकीनंतर भाजपानं इतर 10 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.

 लखनऊः हमीरपूर पोटनिवडणुकीनंतर भाजपानं इतर 10 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. यात सर्वात जास्त चर्चा मऊमधल्या घोसी या जागेची होत आहे. कारण भाजपानं या जागेवरून रस्त्यावरील भाजी विक्रेत्याच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. घोसी जागेवरून भाजपानं विजय राजभर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. बिहारचे राज्यपाल असलेल्या फागू चौहान यांच्या मुलाला उमेदवारी मिळण्याची आशा होती, परंतु त्याचा पत्ता कट करून विजय राजभर यांना संधी देण्यात आली.भाजपाची तिकीट मिळाल्यानंतर विजय राजभर म्हणाले, संघटनेनं मला मोठी जबाबदारी दिली आहे. माझे वडील रस्त्यावर भाजी विकतात. मी या परीक्षेत पास होण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. फागू चौहान यांना बिहार राज्याचे राज्यपाल बनवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं स्वप्न साकार करण्यासाठीच भाजी विक्रेत्याच्या मुलाला उमेदवारी देण्यात आल्याचं भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं आहे.समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचं पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं स्वप्न होतं, विजय राजभर मऊमध्ये पार्टीचे नगर अध्यक्ष आहेत. ते नेहमीच राजकारणात सक्रिय असतात. ते नगरपालिका निवडणुकीतही निवडून आले होते. भाजपाकडून मुलाला विधानसभेचं तिकीट मिळाल्यानं वडिलांच्याही आनंदाला पारावार उरलेला नाही. विजय राजभर यांच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही व्यक्त केले आहेत. तसेच मुलाला विजयासाठी आशीर्वादही दिला आहे. भाजपाने उत्तर प्रदेशमधील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 10 उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच, केरळ - 5, आसाम – 4, पंजाब -2, हिमाचल प्रदेश - 2, सिक्कीम -2, बिहार - 1, छत्तीसगड -1, मध्यप्रदेश -1, मेघालय -1, ओदिशा -1, राजस्थान -1, तेलंगणा -1 या भाजपाच्या पहिल्या यादीत समावेश आहे. 

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश