शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

एकत्र निवडणुका विरोधकांना अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 04:43 IST

पंतप्रधानांच्या बैठकीवर घातला बहिष्कार

- शीलेष शर्मा नवी दिल्ली : देशभरात लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, बसपच्या प्रमुख मायावती, सपचे अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, द्रमुकचे एम. के. स्टॅलिन आदी नेते अनुपस्थित राहिले. शिवसेनच्या वर्धापन दिन मेळाव्यामुळे उद्धव ठाकरेही बैठकीला आले नाहीत.या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे नेते डी. राजा, जनता दल (यू)चे प्रमुख नितीशकुमार, अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पीपीडीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, नॅशनल पीपल्स पार्टीचे नेते कोनार्ड संगमा उपस्थित होते.या बैठकीत कोणताही निर्णय होणे अपेक्षित नव्हते. केवळ विविध पक्षांची मते समजून घेऊन एकमत होते का, हे पाहणे हा बैठकीचा हेतू होता. एकत्र निवडणुका हा सापळा असल्याची शंका विरोधकांच्या मनात आहे. त्यात आपण न अडकण्याची काळजी विरोधकांकडून घेण्यात येत आहे. जनतेचा पैसा वाचविण्यासाठी लोकसभा, विधानसभांच्या एकत्र निवडणुका घ्याव्यात अशी सूचना विधी आयोगाने आॅगस्ट महिन्यात केली होती. त्याबद्दलचा एक प्रस्ताव विधी खात्याला पाठविण्यात आला होता.माकपची टीकालोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेणे ही संघराज्य, लोकशाही तसेच राज्यघटनाविरोधी कृती आहे अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली. ते म्हणाले की, राज्यघटनेनुसार सरकार विधीमंडळाला उत्तरदायी असते. सभागृहामध्ये अविश्वास ठराव मंजूर झाल्यास संबंधित सरकारला राजीनामा द्यावा लागतो. अशा स्थितीत लोकसभा वा विधानसभा बरखास्त करून नव्याने निवडणुका घ्याव्या लागतात. तशी राज्यघटनेत तरतूद आहे. अशा स्थितीत एकत्र निवडणुका घेण्याच्या प्रस्तावामुळे राज्यांच्या कारभारात राज्यपाल व केंद्र सरकारचा हस्तक्षेपही वाढण्याची शक्यता आहे.स्थापणार समितीनिवडणुका एकत्र घेण्याच्या मुद्द्याचा अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक समिती स्थापन करणार आहेत. ठरावीक मुदतीत आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करावा, असे या समितीला सांगण्यात येईल. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर बुधवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एकत्र निवडणुका घेण्याबाबत भाकप, माकपमध्ये काही मतभेद जरूर आहेत. मात्र, या संकल्पनेला त्यांनी विरोध केलेला नाही.

टॅग्स :ElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी