मेट्रोरिजनसाठी रविवारी निवडणूक

By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:18+5:302015-05-18T01:16:18+5:30

नागपूर: महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) एकूण २८ जागांसाठी रविवारी १७ मे रोजी निवडणूक होत असून प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. ४७५ मतदारांसाठी जिल्‘ातील ८ केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली असून स. ८ वा.पासून मतदानाला सुरुवात होईल. या निवडणुकीसाठी पसंतीक्रमानुसार मतदान होणार आहे.

Election on Sunday for Metrology | मेट्रोरिजनसाठी रविवारी निवडणूक

मेट्रोरिजनसाठी रविवारी निवडणूक

गपूर: महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) एकूण २८ जागांसाठी रविवारी १७ मे रोजी निवडणूक होत असून प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. ४७५ मतदारांसाठी जिल्ह्यातील ८ केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली असून स. ८ वा.पासून मतदानाला सुरुवात होईल. या निवडणुकीसाठी पसंतीक्रमानुसार मतदान होणार आहे.
२८ जागापैकी २० जागा मोठ्या नागरी मतदारसंघातील तर आठ जागा ग्रामीण मतदारसंघातील आहेत. नागरी मतदारसंघातील २० जागांसाठी २५ तर ग्रामीण मतदारसंघातील ८ जागांसाठी १६ असे एकूण ४१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांचा समावेश आहे. एकूण मतदारांची संख्या ४७५ असून त्यापैकी शहरातील १४५ आणि ग्रामीणमधील ३३० आहेत. शहरी मतदारसंघातील मतदारांसाठी सिव्हील लाईन्समधील महापालिकेच्या कार्यालयात मतदान केंद्र आहे तर ग्रामीण मतदारसंघातील मतदारांसाठी त्या त्या पंचायत समिती कार्यालयात मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी मतदारांना मतपत्रिकेवर उमेदवारांचा पसंतीक्रम लिहायचा आहे. त्यासाठी त्यांना मराठी किंवा इंग्रजी या दोन भाषाचाच वापर करता येईल. यासाठी विशेष पेनची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात पांढरी तर ग्रामीणमध्ये गुलाबी मतपत्रिका असेल. मतदारांना केंद्रावर मोबाईल नेण्यास मनाई असेल,असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
चौकट
मेट्रोरिजन निवडणूक
मतदारसंघ जागा उमेदवार मतदार
नागरी २० २५ १४५
ग्रामीण ०८ १६ ३३०
---------------
मतदान केंद्राची व्यवस्था
नागरी मतदारसंघ - महापालिका कार्यालय, सिव्हील लाईन्स
ग्रामीण मतदारसंघ- प.स. कार्यालय,नागपूर, पं.स. कार्यालय उमरेड, पं.स. कार्यालय, कळमेश्वर, पं.स. कार्यालय,मौदा, पं.स. कार्यालय, पारशिवनी, पं.स. कार्यालय, हिंगणा पं.स. कार्यालय, कामठी
----------
मतमोजणी १९ ला
मतमोजणी १९ मे रोजी सांस्कृतिक बचत भवन, सीताबर्डी येथे स. ८ वा.पासून सुरू होणार आहे. यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Election on Sunday for Metrology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.