शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चक्क 'फुलपाखरा'साठी निवडणूक ! तब्बल ६० हजार नागरिकांनी केले मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 14:37 IST

राष्ट्रीय वृक्ष, प्राणी, पक्षी आणि राष्ट्रीय फुल देखील आहे. मग फुलपाखरू का नसावे, म्हणून ही निवडणूक घेण्यात आली.

ठळक मुद्देपहिल्यांदाच उपक्रम ।  ५० टक्के लोकांना नव्हती फुलपाखराबद्दल अधिक माहिती

श्रीकिशन काळे -पुणे : राष्ट्रीय फुलपाखराची निवड करण्यासाठीची निवडणूक झाली असून, त्यात सुमारे ६० हजार नागरिकांनी आवडीच्या फुलपाखराला मतदान केले आहे. असा उपक्रम पहिल्यांदाच घेतला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याची माहिती निवडणुक समन्वयक दिवाकर ठोंबरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

राष्ट्रीय वृक्ष, प्राणी, पक्षी आणि राष्ट्रीय फुल देखील आहे. मग फुलपाखरू का नसावे, म्हणून ही निवडणूक घेण्यात आली. राष्ट्रीय फुलपाखरासाठी सात फुलपाखरू उमेदवार होते. त्यापैकी एकाची निवड नागरिकांना करायची होती. यासाठीचे ऑनलाईन मतदान ८ ऑक्टोबरला संपले असून, त्याचा अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय फुलपाखराची अधिकृत घोषणा होईल. या उपक्रमाचे समन्वयक ठोंबरे म्हणाले की, या निवडणुकीत ६० हजार नागरिकांनी आपले मत नोंदवले आहे. आम्हाला एवढा प्रतिसाद येईल, असे वाटले नव्हते. मत दिलेल्यांंपैकी ४० ते ५० टक्के लोकांना फुलपाखरांची संपूर्ण माहिती नव्हती. फुलपाखरांचे एवढे प्रकार असतात, ते अंडी देतात, कोष करतात आणि अळीचे फुलपाखरू बनते ही प्रक्रिया अनेकांना माहित नव्हती. या उपक्रमाने त्याबाबतची माहिती हजारो लोकांपर्यंत गेली. संवर्धनासाठी त्याचा उपयोग होईल.

सात फुलपाखरांपैकी एक निवडायचे होते. त्यातील तीन-चार फुलपाखरांमध्ये कांटे की टक्कर झाली आहे. आता अंतिम अहवाल लवकरच पर्यावरण मंत्रालयात पाठवू. तिथल्या सचिवांशी बोलणं झालं असून, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर याविषयी उत्सुक आहेत. त्यांच्यापर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे.- दिवाकर ठोंबरे, समन्वयक, फुलपाखरू निवडणूक

कोण बाजी मारणार ?इंडियन जझेबेल, फाइव्ह बार स्वॉर्डटेल, कृष्णा पिकॉक, यलो जॉरजोन, ऑरेंज ओकलिफ, नॉर्थन जंगलक्वीन आणि इंडियन नवाब असे सात उमेदवार आहेत. त्यात कोण बाजी मारेल, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.  

टॅग्स :Puneपुणे