Election Results Live - पराभवानंतर मायावतींचा इव्हीएमच्या नावाने शिमगा
By Admin | Updated: March 11, 2017 15:11 IST2017-03-11T14:01:40+5:302017-03-11T15:11:49+5:30
उत्तर प्रदेशमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी पराभवाचे खापर एव्हीएमवर फोडले

Election Results Live - पराभवानंतर मायावतींचा इव्हीएमच्या नावाने शिमगा
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 11 - उत्तर प्रदेशमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी पराभवाचे खापर एव्हीएमवर फोडले आहे. भाजपाने इव्हीएम मशीन मॅनेज करून हा विजय मिळवला आहे, असा आरोप मायावतींनी केला आहे. भाजपाने मशीन मॅनेज करून लोकशाहीची हत्या केली आहे. जर त्यांच्यात हिंमत असेल, मोदी आणि शहा यांच्यात विजयाबाबत आत्मविश्वार असेल, तर त्यांनी ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा बॅलेट पेपरने मतदान घ्यावे, असे आव्हान मायावतींनी दिले आहे.
उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत तीनशेहून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर सपा आणि काँग्रेस आघाडीला 100 जागाही मिळवता आलेल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीत भोपळ्यावर बाद झालेल्या मायावतींच्या बसपाची या निवडणुकीतही दाणादाण उडाली असून, त्यांना केवळ 18 जागांवरच आघाडी मिळवता आली आहे.