शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

Assembly Election Results: तीन राज्यांत भाजपाचे 'तीनतेरा', तेलंगणात TRSचा विजयाचा नगारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 5:41 PM

राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मुंबई - देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसला अच्छे दिन आल्याचे चित्र दिसत आहे. तर, तीन राज्यातून भाजपाला सत्ता गमवावी लागल्याने भाजपासाठी हा निकाल चिंताजनक ठरला आहे. तेलंगणात गतवर्षीपेक्षा कमी जागा भाजपच्या पदारात पडल्या असून मिझोरमध्ये केवळ 1 जागेवर भाजपाला समाधान मानावे लागणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे कुठेतरी भाजपाच्या विजयाचा अश्वमेध रोखण्यात काँग्रेसला यश आले असे, म्हणता येईल. 

राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे भाजपच्या विजयी रथाला ब्रेक लागला असून गुजरात अन् कर्नाटक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्या भाजपा कार्यलयात आज शांती-शांती दिसून येत आहे. राजस्थानमध्ये वसुंधराराजे यांच्या नेतृत्वात भाजपने निवडणूक लढवली. मात्र, भाजपला येथे सत्ता गमवावी लागली. तर मध्य प्रदेशमध्येही भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे येथील सत्तेच्या सारीपाटावरुन पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्येही जोतिर्रादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे अच्छे दिन आल्याचे दिसून येते. तसेच, तेलंगणात भाजपला सपाटून मार खावा लागला आहे. गतवर्षीच्या निवडणुकांमध्ये तेलंगणात भाजपाला 5 जागांवर विजय मिळाला होता. यंदा भाजपाचा एकच उमेदवार तेलंगणातून निवडणून आला आहे. तेलुगू लोकांनी भाजपला नाकारत प्रादेशिक पक्ष असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीला स्पष्टपणे स्विकारले आहे. 

छत्तीसगडमध्येही भाजपाला सत्ता राखण्यात अपयश आले आहे. छत्तीसडमध्ये काँग्रेसने मोठी आघाडी घेत एकहाती सत्ता मिळवली आहे. छत्तीसगड 2013 मध्ये 49 जागांवर विजय मिळवत भाजपाने सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 39 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, यंदा येथे उलटे चित्र पाहायला मिळत आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस 63 जागांवर विजय मिळवेल, अशी परिस्थीती आहे. तर भाजपच्या जवळपास 32 जागा कमी होणार आहेत.  

मिझोरममध्ये गतवर्षीच्या निवडणुकीत काँग्रेसने 34 जागा जिंकत सत्ता मिळवली होती. मात्र, येथून काँग्रेसला सत्ता सोडावी लागणार आहे. कारण, मिझो नॅशनल फ्रंटने स्पष्ट बहुमत मिळविल्याचे दिसून येत आहे. येथे बहुमताचा आकडा 21 असून एमएनएफची 26 जागांवर विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.  

देशातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालांची सद्यस्थिती. 

एकूण जागा - १९९बहुमताचा आकडा - १०१भाजपा - ७२ (-९१)काँग्रेस - १०१ (+८०)इतर - २६

मध्य प्रदेश 

एकूण जागा - २३० बहुमताचा आकडा - ११६भाजपा - १०४ (-६१)काँग्रेस आघाडी - ११७ (+५९)बसपा - २इतर - ७

छत्तीसगड 

एकूण जागा - ९०बहुमताचा आकडा - ४६भाजपा - १७ (-३२)काँग्रेस - ६३ (+२४)बसपा+ - 4 इतर - ५

तेलंगणा 

एकूण जागा - ११९बहुमताचा आकडा - ६० टीआरएस - ८७ (+२४)काँग्रेस + टीडीपी - २२ भाजपा - १ (-४)इतर - ९

मिझोरम

एकूण जागा - ४०बहुमताचा आकडा - २१काँग्रेस - ५मिझो नॅशनल फ्रंट - २६भाजपा+ - 1इतर - ८

या पाचपैकी एकाही राज्यात भाजपाला सत्ता मिळविण्यात यश आले नाही. तर, राजस्थान, मध्य प्रदेश अन् मिझोरमध्ये सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे या पाच राज्यांच्या निकाल भाजपच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरु शकतो. विशेष म्हणजे तेलंगणात तेलुगू जनतेनं भाजपाला स्पष्टपणे नाकारलं आहे. तेलंगणात भाजपला अद्याप केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. तर मिझोरमध्येही एका जागेवर भाजपा आघाडीवर आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालBJPभाजपाRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकTelanganaतेलंगणा