शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

Election Results 2023 Live Updates : राजस्थान 'परंपरा' राखणार, तेलंगणात 'शॉक' बसणार; पाहा चार राज्यांमध्ये कुणी घेतलीय आघाडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 10:51 IST

Election Results 2023 Live Updates : सकाळी दहा वाजेपर्यंत मिळालेल्या कलानुसार, भाजप मध्यप्रदेशातील सत्ता कायम ठेवत आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी आज मतमोजणी होत आहे. या चार राज्यांचे निवडणूक कल आता समोर येत आहेत. सकाळी दहा वाजेपर्यंत मिळालेल्या कलानुसार, भाजप मध्यप्रदेशातील सत्ता कायम ठेवत आहे. राजस्थानमध्ये परंपरा राखली जाण्याची शक्यता असून भाजप सत्तेत येत असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच, राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदल होते, त्याचप्रमाणे यंदाही असेल, असे सुरुवातीच्या कलामधून दिसते. तेलंगणामध्ये सत्ताधारी बीआरएसला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, तेलंगणात काँग्रेस बहुमताकडे जोराने वाटचाल करत आहे. याशिवाय, छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत सुरु आहे.

(मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!)

मध्य प्रदेशात भाजप आघाडीवरमध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागा असून स्पष्ट बहुमतासाठी ११६ जागांची गरज आहे. २३० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. मध्य प्रदेशात यंदा विक्रमी 76.22 टक्के मतदान झाले. हे विक्रमी मतदान भाजपच्या पथ्यावर पडलेले दिसत आहे. दरम्यान, सकाळी दहा वाजेपर्यंतच्या कलानुसार, भाजपने १४० जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस ८५ जागांवर आघाडीवर आहे.

राजस्थान 'परंपरा' राखणारराजस्थानमध्ये विधासभेच्या २०० जागा आहेत. त्यापैकी १९९ जागांवर मतदान झाले आहे. आतापर्यंत या ठिकाणी पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे. यंदा सुद्धीा राजस्थान ही परंपरा राखणार असल्याचे दिसून येत आहे आहे. सकाळी दहा वाजेपर्यंतच्या कलानुसार, १९९ पैकी १०६ जागांवर भाजपने आघाडी घेत काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेस ८१ जागांवर आघाडीवर आहे.

छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरसछत्तीसगड विधानसभेसाठी ९० जागांवर मतदान झाले. छत्तीसगडमध्ये २०१८ नंतर १५ वर्षांनी काँग्रेस सत्तेत आली होती. परंतु आता काँग्रेसला सत्ता राखण्यासाठी चुरशीची लढत करावी लागत आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच टक्कर दिसत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंतच्या कलानुसार, काँग्रेसने ४५ जागांवर आघाडी घेतली असून भाजप ४३ जागांवर आघाडीवर आहे. दोन ठिकाणी इतरांना यश मिळाले आहे.

तेलंगणात काँग्रेस सत्तेवर येणार?तेलंगणात विधानसभेसाठी ११९ जागांवर मतदान झाले. या ठिकाणी के.चंद्रशेखर राव याचा बीआरएस पक्ष सत्तेतून जात आहे. तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून सुरुवातीच्या आकडेवाडीनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेस ६५ जागांवर आघाडीवर असून बीआरएस ४२ जागांवर आघाडी घेत आहे. भाजपा ८ आणि एमआयएम २ जागांवर सध्या पुढे असल्याचे दिसून येत आहे.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३ElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती