ELECTION RESULT-भाजपावर विश्वास दाखवल्याबद्दल जनतेचा आभारी- नरेंद्र मोदी

By Admin | Updated: February 23, 2017 20:14 IST2017-02-23T20:07:29+5:302017-02-23T20:14:45+5:30

महाराष्ट्रासह मुंबईतल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले आहेत.

ELECTION RESULT - Thanking the people for showing faith in BJP - Narendra Modi | ELECTION RESULT-भाजपावर विश्वास दाखवल्याबद्दल जनतेचा आभारी- नरेंद्र मोदी

ELECTION RESULT-भाजपावर विश्वास दाखवल्याबद्दल जनतेचा आभारी- नरेंद्र मोदी

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 23 - महाराष्ट्रासह मुंबईतल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले आहेत. भारतातला प्रत्येक नागरिक हा भाजपावर विश्वास दाखवतोय. त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे, मजबूत आणि सर्वसमावेशक भारत तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. 

महाराष्ट्रात भाजपानं स्वतःला सिद्ध करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. भाजपाचा पारदर्शक कारभार महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे. महाराष्ट्रात मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्रातील भाजपाचे कार्यकर्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं मी अभिनंदन करतो.

महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत भाजप कार्यकर्ते पोहोचले आहेत. कठोर परिश्रम, निर्धार आणि मेहनतीच्या जोरावर भाजपा कार्यकर्त्यांनी पक्ष शहरी आणि ग्रामीण भागातही मजबूत केला आहे. त्यामुळे मी भाजपाच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानतो, असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. 

Web Title: ELECTION RESULT - Thanking the people for showing faith in BJP - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.