शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मिझोराममध्ये सर्वात कमी वयाची महिला आमदार बनली; बॅरील व्हॅनेहसांगी कोण आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 12:43 IST

२०१८मध्ये अधिकृतरीत्या झेडपीएम आघाडीची स्थापना झाली. मात्र, आयोगाकडे नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागली.

मिझोराम विधानसभा निवडणुकीत झोरम पीपल्स मूव्हमेंटने २७ जागा जिंकल्या आहेत. तर MNF ला फक्त १० जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत आणखी एक रेकॉर्ड बनला की इथं पहिल्यांदाच निवडणुकीत ३ महिलांनी विजय मिळवला. बहुमत मिळविणाऱ्या झेडपीएम पक्षाच्या बॅरील व्हॅनेहसांगी, लालरीनपुई आणि एमएनएफच्या प्रोव्हा चाक्मा यांचा विजय झाला. मावळत्या विधानसभेत एकही महिला आमदार नव्हत्या. 

बॅरील व्हॅनेहसांगीनं आयजोल साऊथ ३ मधून विजय मिळवला आहे. बॅरील मिझोराममधील सर्वात कमी वयाची महिला आमदार बनली आहे. बॅरीलचं वय ३२ वर्ष आहे. ती झोरम पीपल्स मूव्हमेंटची उमेदवार होती. तिला एकूण ९३७० मते मिळाली. तर एमएनएफचे उमेदवार एफ लालराममाविया यांना ७ हजार ९५६ मते पडली. त्यामुळे बॅरील यांचा १ हजार ४१४ मतांनी विजय झाला.बॅरील व्हॅनेहसांगीनं शिलॉंगच्या नॉर्थ ईस्टर्न हिल यूनिवर्सिटीतून पदवीचं शिक्षण घेतले आहे. त्यांच्या वडिलांचे नाव वानरोचुआंग असं आहे. तसेच ती एक प्रसिद्ध टीव्ही अँकर होती. 

निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार बॅरील यांचा कुठलाही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. याआधी ती आयजोल नगरपालिकेच्या नगरसेविका होत्या.बॅरील व्हॅनेहसांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. इन्स्टाग्रामवर त्यांना २ लाख ६० हजार फोलोअर्स आहेत. मिझोरामध्ये ४० सदस्यांच्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या केवळ ३ आहे.  यावेळी १७४ उमेदवारांपैकी केवळ १६ उमेदवार महिला होत्या.लालदुहोमा यांनी मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स, झोरम नॅशनलिस्टिक पार्टी, झोरम एक्सोडस मूव्हमेंट, झोरम डिसेंट्रलायझेशन फ्रंट, झोरम रिफॉर्मेशन फ्रंट आणि मिझोराम पीपल्स पार्टी या पक्षांना एकत्र आणले. २०१८मध्ये अधिकृतरीत्या झेडपीएम आघाडीची स्थापना झाली. मात्र, आयोगाकडे नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागली.

असा साकारला विजय...पक्षाने तळागाळात जाऊन प्रचार केला. स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. भाजप किंवा काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे लालदुहोमा यांनी स्पष्ट केले होते. पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवू, असे त्यांनी म्हटले होते. राज्यातील जनतेने याच मुद्द्यांना स्वीकारत त्यांच्या पारड्यात मतांचे दान दिले. पक्षाने तळागाळात जाऊन प्रचार केला. स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. भाजप किंवा काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे लालदुहोमा यांनी स्पष्ट केले होते. 

टॅग्स :mizoram assembly electionमिझोराम विधानसभा निवडणूक २०२३Electionनिवडणूक