Election Result Live - मणिपूरमध्ये काँग्रेसला आघाडी
By Admin | Updated: March 11, 2017 09:24 IST2017-03-11T09:22:34+5:302017-03-11T09:24:13+5:30
ईशान्य भारतातील महत्वाच राज्य असलेल्या मणिपूरमध्ये काँग्रेसने चांगली सुरुवात केली आहे.

Election Result Live - मणिपूरमध्ये काँग्रेसला आघाडी
ऑनलाइन लोकमत
इम्फाळ, दि. 11 - ईशान्य भारतातील महत्वाच राज्य असलेल्या मणिपूरमध्ये काँग्रेसने चांगली सुरुवात केली आहे. 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत काँग्रेस 5, अन्य चार आणि भाजपा 1 जागांवर आघाडीवर आहे. मणिपूरमध्ये भाजपाचे कमळ फुलेल असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी वर्तवला होता. पण एक्झिट पोलचा अंदाज चुकेल असे दिसत आहे. या राज्यात काँग्रेसची सत्ता कायम राहिल असा अंदाज आहे.
मणिपूरमध्ये गेल्या 15 वर्षांपासून ओकाराम इबोबी सिंग यांची सत्ता आहे. टाइम्स नाऊ व्हीएमआरच्या एक्झिट पोलने मणिपूरमध्ये भाजपाला 25 ते 31, काँग्रेसला 17 ते 23 आणि इतर पक्ष व अपक्षांना 9 ते 15 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होतातर सी-व्होटरनेही मणिपूरमध्ये भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवली आहे.
सी-व्होटरच्या अंदाजानुसार मणिपूरमध्ये भाजपा 28 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरेल. तर काँग्रेसला केवळ 20 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर अन्य पक्षांना 12 पर्यंत जागा मिळू शकतात. 2012 साली झालेल्या मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला 42 जागांवर विजय मिळाला होता. तर तृणमूल काँग्रेसने 7 जागा जिंकल्या होत्या तर इतरांच्या खात्यात 11 जागा गेल्या होत्या. मात्र यावेळी सत्तेत येण्यासाठी प्रबळ दावेदार बनलेल्या भाजपाला त्यावेळी एकही जागा जिंकता आली नव्हती.