शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक निष्पक्ष व पारदर्शी होणार, उद्याच अधिसूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 09:04 IST

सोनिया गांधी यांना भेटले वेणुगोपाल

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू असताना पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली व निवडणूक निष्पक्ष व पारदर्शी होणार असून, त्यात कोणीही उभा राहू शकतो, असे सांगितले. 

सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर वेणुगोपाल यांनी सांगितले की, ही एक नियमित भेट होती व संघटनेशी संबंधित काही प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा झाली. वेणुगोपाल मागील काही दिवसांपासून ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होते व मंगळवारी त्यांनी येथील १० जनपथवर सोनिया गांधी यांची भेट घेतली. ज्येष्ठ नेते राहुल गांधी उमेदवारी अर्ज दाखल करतील का, असे विचारले असता वेणुगोपाल म्हणाले की, याबाबतचा निर्णय राहुल गांधी घेतील. त्यांना याबाबत मला काहीही सांगितलेले नाही. शशी थरूर यांच्या निवडणूक लढण्याच्या शक्यतेबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, फक्त थरूरच नव्हे तर कोणीही निवडणूक लढवू शकतो. 

अनेक राज्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याची मागणी करणारा प्रस्ताव पारित केला आहे. त्याबाबत विचारले असता, वेणुगोपाल म्हणाले की, त्यात चुकीचे काय आहे? यात्रेमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा व प्रेम मिळत आहे. राहुल गांधी हे दृढ संकल्प असणारे व्यक्ती आहेत. कार्यकर्त्यांना त्यांचे नेतृत्व हवे आहे. काॅंग्रेसच्या सर्वोच्च पदांसाठी दोन दशकांनंतर निवडणुकीत लढत होण्याची शक्यता वाढली आहे.

निवडणुकीची अधिसूचना उद्या जारी होणारकाँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीची अधिसूचना २२ सप्टेंबरला जारी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख ८ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास १७ ऑक्टोबरला मतदान घेण्यात येणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर हाेणार आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी