शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

एकत्र निवडणुका घेण्यावर पुढील आठवड्यात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:52 IST

लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या व्यवहार्यतेवर निवडणूक आयोग व विधी आयोग यांच्यात पुढील आठवड्यात विचारविमर्ष होणार आहे.

नवी दिल्ली - लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या व्यवहार्यतेवर निवडणूक आयोग व विधी आयोग यांच्यात पुढील आठवड्यात विचारविमर्ष होणार आहे.एकत्र निवडणुकांवर विधी आयोगाने जाहीर विचारमंथनासाठी ‘वर्किंग पेपर’ प्रसिद्ध केल्यानंतर ही बैठक होत आहे. निवडणूक आयोगाने या चर्चेसाठी विधी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश न्या. बी. एस. चव्हाण यांच्यासह आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना १६ मे रोजी पाचारण केले आहे. विधी आयोगातील सूत्राने सांगितले की, एकत्र निवडणुकांच्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी नक्कीच चर्चा करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र निवडणुका घेण्याची आग्रही भूमिका मांडली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अभिभाषणात त्यास अनुकुलता दर्शविली. विधी मंत्रालयाशी संलग्न स्थायी संसदीय समितीनेही २०१६ मध्ये तशी शिफारस केली. त्यानंतर विधी मंत्रालयाने या विषयाचा उहापोह दोन स्वतंत्र दृष्टिकोनांतून व्हावा, असे सुचविले. एक, एकत्र निवडणुका घेण्याची कायदेशीर चौकट तयार करण्यासाठी राज्यघटना व विविध कायद्यांमध्ये कराव्या लागणाºया सुधारणा. दोन, यासाठी करावी लगणारी व्यवस्थात्मक तयारी, अपेक्षित खर्च, कामाचा व्याप आणि त्यासाठी लागणारा वेळ इत्यादी. यातील पहिल्या भागावर सांगोपांग चर्चा व्हावी या हेतूनेच विधी आयोगाने ‘वर्किंग पेपर’ जारी केला असून त्यावर कायदेतज्ज्ञ, राजकीय पक्ष व अन्य संबंधितांची मते मागविली आहेत. त्यानंतर विधी आयोग या विषयीचा आपला सविस्तर अहवाल तयार करेल.मुख्य निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत यांचे म्हणणे होते की, निवडणुकांची जी विधिसंमत चौकट ठरेल त्यानुसार निवडणुका घेणे हे आयोगाचे काम आहे. म्हणूनच एकत्र निवडणुका घेण्यासाठी कायदेशीर चौकट कशी असावी हे ठरवावे लागेल. त्यानुसार राज्यघटना व अन्य कायद्यांमध्ये बºयाच दुरुस्त्या कराव्या लागतील. हे व्हायला बराच वेळ लागेल.विधि आयोगाचा प्रस्तावलोकसभा व सर्व विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आवश्यक कायदेशीर चौकट तयार करण्याच्या दृष्टीने विधि आयोगाने तयार केलेले प्रमुख प्रस्ताव केले आहेत ते असे:एकत्र निवडणुका घेण्यासाठी लोकसभा व विधानसभांची मुदत भविष्यात एकाच वेळी संपावी यासाठी ही पद्धत सुरू करताना सुरुवातील लोकसभा व/किंवा काही राज्य विधानसभांची मुदत वाढवावी वागेल किंवा कमी करावी लागेल. यासाठी राज्यघटनेच्या ८३ (२) व १७२ (१) या अनुच्छेदांमध्ये तसेच लोकप्रतिनिधित्व कायद्यातही दुरुस्त्या कराव्या लागतील.अशा एकत्र निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्या लागतील. पहिला टप्पा २०१९ मध्ये व दुसरा टप्पा २०२४ मध्ये. त्यानंतर नियमितपणे त्या घेता येऊ शकतील.5 पाच वर्षांच्या आधी मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागू नयेत यासाठी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडणाºया विरोधी पक्षांना त्यासोबत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचीही सक्ती असावी. अविश्वास ठराव व विश्वासदर्शक ठराव दोन्ही मंजूर झाले तरच सत्तांतर होईल.निवडणूक आयोग काय म्हणतो?एकत्र निवडणुकांस विरोध नाही.यासाठी अधिक संख्येने मतदान यंत्रे व व्हीव्हीपीटी यंत्रे खरेदी करावी लागतील.त्यासाठी सुमारे नऊ हजार रुपये खर्च येईल.पहिला टप्पा : आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, मध्ये प्रदेश व महाराष्ट्रदुसरा टप्पा : उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, दिल्ली व पंजाब

टॅग्स :ElectionनिवडणूकIndiaभारतGovernmentसरकार