शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

‘इलेक्शन किंग’ के. पद्मराजन लढत आहेत २०१वी निवडणूक, राहुल गांधींविरुद्धही अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 08:19 IST

वायनाडमधूनही उमेदवारी : गिनिज बुकच्या विक्रमासाठी धडपड

सेलम (तामिळनाडू) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करणारे के. पद्मराजन हे त्यांच्या आयुष्यातील २०१वी निवडणूक लढवत आहेत. आतापर्यंत एकही निवडणूक न जिंकूनही ते ‘इलेक्शन किंग’ म्हणून ओळखले जातात.सर्वात अयशस्वी व सर्वात जास्त निवडणुका लढविणारा उमेदवार म्हणून आपली नोंद गिनिज बुकात होण्याकरिता ते आता नवा विक्रम रचू पाहात आहेत.के. पद्मराजन यांच्या अनोख्या कामगिरीची दखल लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्नेही घेतली आहे.

सामान्य माणूसही निवडणूक लढू शकतो हेच त्यांना आपल्या कृतीतून सिद्ध करायचे असते. वाहनांच्या टायरची विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. तामिळनाडूतील धर्मापुरी मतदारसंघातूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आता ते वायनाडमध्ये दाखल झाले. सातत्याने निवडणुका लढविण्याच्या प्रयत्नांमुळे माझे नाव २००४ साली गिनिज बुकात नोंदविण्यात आले आहे. गिनिज बुकच्या वेबसाइटवरही माझे नाव २०१५ साली झळकले आहे. पण मी अजून विक्रम केलेला नाही. ते ध्येय साध्य करायचे आहे, असे ६० वर्षे वयाचे के. पद्मराजन सांगतात, तेव्हा हे ऐकणारे सारेच जण अचंबित होतात. त्यांनी १९८८ साली मेत्तूर विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढविली होती. नंतर १९९६ साली लोकसभा व विधानसभा निवडणुकांत वेगवेगळ््या आठ मतदारसंघांतून त्यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यानंतर निवडणूक आयोगाने एखाद्या उमेदवाराने एकाचवेळी दोन मतदारसंघांतूनच निवडणूक लढवावी असा नियम केला होता. पद्मराजन यांना आतापर्यंत सवाधिक ६७२३ मते २०११ साली मेत्तूर विधानसभा मतदारसंघात मिळाली होती. (वृत्तसंस्था)आतापर्यंत ३० लाख खर्चगेल्या ३० वर्षांत निवडणुकांवर त्यांनी ३० लाख रुपये खर्च केले आहेत. आंध्र प्रदेशमधील नांद्यालमधून दिवंगत पी. व्ही. नरसिंह राव यांच्याविरोधात ते उभे होते. करुणानिधी, जयललिता, एस. एम. कृष्णा, बंगारप्पा, एच. डी. कुमारस्वामी आदींच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे धाडस पद्मराजन यांनी दाखविले आहे.

टॅग्स :IndiaभारतElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधी