निवडणूक आयोगाचे आदेश धाब्यावर!
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:09+5:302015-04-13T23:53:09+5:30
अजब तर्हा : मौलाना आझाद संशोधन निवडणूक केंद्रावरील प्रकार

निवडणूक आयोगाचे आदेश धाब्यावर!
अ ब तर्हा : मौलाना आझाद संशोधन निवडणूक केंद्रावरील प्रकारऔरंगाबाद : महापालिका निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला मालमत्तेसंबंधी सविस्तर विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रत्येक उमदेवाराच्या मालमत्तेचे विवरणपत्र कार्यालयाच्या परिसरात प्रसिद्ध करावे, असे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. मात्र, मौलाना आझाद संशोधन केंद्रावर एकाही उमेदवाराच्या मालमत्तेसंबंधीचे विवरण प्रसिद्ध करण्यात आले नाही, हे विशेष.रोजाबाग, भारतमातानगर (वॉर्ड-१०), विश्वासनगर, हर्षनगर (११), पहाडसिंगपुरा, बेगमपुरा (१२), आरेफ कॉलनी, प्रगती कॉलनी (१९), जयभीमनगर, घाटी रुग्णालय परिसर (२०), बुढीलाईन, कबाडीपुरा (२१), लोटाकारंजा (२२), चेलीपुरा, काचीवाडा (२३), गणेश कॉलनी (२५), नेहरूनगर (२६), शताब्दीनगर (२७), स्वामी विवेकानंदनगर (२८) या वॉर्डांतील उमेदवारांचे मजनू हिल येथील मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रावर अर्ज स्वीकारण्यात आले. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर १२ वॉर्डांमध्ये १०६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रत्येक उमेदवाराच्या मालमत्तेसंबंधीचे विवरणपत्र प्रसिद्ध करण्याचे आदेश यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. संबंधित अधिकार्यांनी यासंबंधीची कोणतीही तसदी घेतली नाही. उमेदवारांच्या मालमत्तेचा तपशील दाबून ठेवण्यात अधिकार्यांचा नेमका काय हेतू आहे, असाही प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.पत्रकार कक्षच गायबमौलाना आझाद संशोधन केंद्रात निवडणुकीसंबंधी वेळोवेळी माहिती देण्यासाठी पत्रकार कक्षच स्थापन करण्यात आलेला नाही. वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी व कर्मचार्यांकडे कोणत्याही माहितीची मागणी केली, तर कानावर हात ठेवण्यात येतात. निवडणुकीच्या कामासंबंधी प्रचंड गोपनीयता पाळण्यात येत आहे.