शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाची प्रियांका गांधींना नोटीस, पंतप्रधान मोदींसंदर्भात केलं होतं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 08:08 IST

आयोगाने प्रियंका गांधी यांना 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे.

काँग्रेस नेत्या तथा पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेल्या एका दाव्यासंदर्भात, निवडणूक आयोगाने त्यांना गुरुवारी नोटीस बजावली असून उत्तर मागितले आहे. आयोगाने प्रियंका गांधी यांना 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे.

राजस्थानमधील दौसा येथे प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना, मोदी यांनी मंदिरात केलेल्या दानाचा लिफाफा फोडल्यानंतर त्यात केवळ 21 रुपये मिळाले, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर, भाजपने प्रियांका गांधी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यासोबतच प्रियांका गांधी यांच्या भाषणाचा व्हिडिओदेखील जोडण्यात आला होता.

भाजपनं केली होती अशी तक्रार? -यासंदर्भात बोलताना केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटले होते, "काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी 20 ऑक्टोबरला आपल्या भाषणादरम्यान एक वक्तव्य करत आचार संहितेचे उल्लंघन केले,'' असे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले आहे. तसेच, प्रियांका गांधी आचार संहितेपेक्षाही वर आहेत का? असा सवाल करत, आपण खोटे पसरवू शकत नाही आणि धार्मिक भावनेने प्रचार केला जाऊ शकत नाही, असेही मेघवाल यांनी म्हटले होते.काय म्हणाल्या होत्या प्रियांका गांधी? -प्रियांका गांधी म्हणाल्या होत्या, ''आपण तर बघितलेच असेल, मी टीव्हीवर बघितले, माहीत नाही खरे की खोटे. कदाचित पंतप्रधान मोदी देवनारायणजींच्या मंदिरात गेले होते. त्यांनी तेथे लिफाफा टाकला. मी टीव्हीवर बघितले, 6 महिन्यांनंतर, पीएम मोदींनी दान केलेला लिफाफा फोडण्यात आला, तर त्यात 21 रुपये मिळाले." एवढेच नाही, तर "एक प्रकारे हेच सुरू आहे. देशात व्यासपीठावर उभे राहून कशा-कशा प्रकारचे लिफाफे आपल्याला दाखवले जात आहेत. जव्हा आपण ते लिफाफे उघडता तेव्हा निवडणूक संपलेली असते,'' असेही प्रियांका यांनी म्हटले होते.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग