निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया रविवारी कोल्हापुरात

By Admin | Updated: February 3, 2017 18:59 IST2017-02-03T18:59:51+5:302017-02-03T18:59:51+5:30

कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे. एस. सहारिया हे रविवारी (दि. ५) कोल्हापूर जिल्‘ाच्या दौर्‍यावर येत आहेत. सकाळी साडेनऊ वाजता ते शासकीय विश्रामगृहावर शासकीय अधिकार्‍यांची बैठक घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील.

Election Commissioner J. S. Saharaya Sunday in Kolhapur | निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया रविवारी कोल्हापुरात

निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया रविवारी कोल्हापुरात

ल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे. एस. सहारिया हे रविवारी (दि. ५) कोल्हापूर जिल्‘ाच्या दौर्‍यावर येत आहेत. सकाळी साडेनऊ वाजता ते शासकीय विश्रामगृहावर शासकीय अधिकार्‍यांची बैठक घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील.
सध्या महाराष्ट्रभर निवडणुकांचे वातावरण आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर सहारिया हे रविवारी सकाळी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. त्यानंतर लगेचच सर्व विभागांच्या शासकीय अधिकार्‍यांची एक व्यापक बैठक सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागापासून ते बीएसएनएलपर्यंतच्या सुमारे ३० विभागांच्या अधिकार्‍यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Election Commissioner J. S. Saharaya Sunday in Kolhapur