शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

'पॅन'नंतर आता आणखी एक कार्ड 'आधार'ला जोडणार?; देशहितार्थ मोदी सरकारला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 11:35 AM

मोदी सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

नवी दिल्ली: मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्यात यावं अशी मागणी निवडणूक आयोगानं केली आहे. यासाठी आयोगानं कायदे मंत्रालयाला पत्रदेखील लिहिलं आहे. मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्याचे अधिकार दिले जावेत, अशी मागणी आयोगाकडून करण्यात आली आहे. हे पाऊल उचललं गेल्यास बोगस मतदार ओळखपत्रांना चाप बसेल, असा विश्वास आयोगानं व्यक्त केला आहे.  मतदार ओळखपत्र आधार कार्डला जोडण्याची मागणी निवडणूक आयोगानं याआधीही सरकारकडे केली होती. मात्र त्यावेळी आधार प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होतं. त्यामुळे सरकारनं मतदार ओळखपत्र आणि आधारच्या जोडणीचा विषय टाळला. मात्र आता निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा याबद्दलची मागणी केली आहे. मोदी सरकारनं गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या निर्णयांचा धडाका लावल्यानं या मागणीचा सकारात्मक विचार होईल, अशी आशा निवडणूक आयोगाला वाटते. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी निवडणूक प्रक्रियेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यानंतर भाजपाचे नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बोगस मतदान रोखण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी आधार कार्डवर आधारित मतदान प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी मागणी उपाध्याय यांनी याचिकेतून केली होती. आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र जोडल्यानं मूलभूत हक्कांवर गदा येणार नाही, असा दावा उपाध्याय यांनी न्यायालयात केला. या प्रकरणी न्यायालयानं निवडणूक आयोगाला योग्य ते आदेश देण्याची मागणी त्यांनी केली होती. यानंतर न्यायालयानं आयोगाला यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वं तयार करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी निवडणूक आयोगाला आठ आठवड्यांची मुदत देण्यात आली. न्यायालयानं जुलै महिन्यात हा निकाल दिला होता.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक