शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 18:28 IST

Election Commission vs Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज राहुल गांधी यांनी मागितले होते. ते आता ४५ दिवसांत नष्ट केले जाणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज मागणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आयोगाने नकार दिला आहे. असे केल्यास मतदारांच्या गोपनीयतेचे आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे ठरेल असे आयोगाने म्हटले आहे. 

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी आयोग अशाप्रकारचे फुटेज देणार नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसने केलेली मागणी ही त्यांच्यासाठी ठीक असली, मतदारांच्या हिताची असली किंवा लोकशाही प्रक्रियेच्या संरक्षणासाठी योग्य असली तरी देखील प्रत्यक्षात त्याचा उद्देश अगदी उलट उद्दिष्ट साध्य करण्याचा असल्याचे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

या मागणीला अतिशय तार्किक मागणी म्हणून समोर आणले जात आहे. ती प्रत्यक्षात मतदारांच्या गोपनीयतेचे आणि सुरक्षिततेच्या चिंतेचे उल्लंघन आहे. हे लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५० आणि १९५१ मध्ये घालून दिलेल्या कायदेशीर भूमिकेच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. असे फुटेज शेअर केले तर ज्यांनी मतदान केले आहे आणि ज्यांनी मतदान केले नाहीय त्यांच्या गोपनियतेला धोका निर्माण होईल. दोघेही असामाजिक घटकांचे लक्ष्य बनू शकतात. यामुळे कोणत्याही व्यक्तीला किंवा गटाला मतदार ओळखणे सोपे जाईल, अशी भीती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

याचबरोबर निवडणूक आयोगाने या निवडणुकांची सर्व सीसीटीव्ही फुटेज, व्हिडीओ ४५ दिवसांत नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ज्याच्याकडून उत्तर हवे होते तोच पुरावे नष्ट करत आहे. हे स्पष्ट आहे की सामना फिक्स आहे आणि फिक्स्ड निवडणूक लोकशाहीसाठी विष आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस