शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

''नमो'' टीव्हीवरील प्रक्षेपणाला निवडणूक आयोगाची परवानगी, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 16:26 IST

नमो टीव्ही हा आमच्याच नमो अ‍ॅपचा भाग असून, त्याचे प्रक्षेपण टेलीकास्ट न करता वेबकास्ट केले जाते, असे भाजपने मान्य केले आहे.

नवी दिल्ली - भाजपाच्यानिवडणूक प्रचाराचे तंत्र असलेल्या नमो टीव्हीच्या प्रक्षेपणावर निवडणूक आयोगाने बंदी आणली होती. मात्र, आता काही अटी आणि शर्ती घालत आयोगाने या टीव्हीवरील प्रक्षेपणाला परवानगी दिली आहे. केवळ Live प्रक्षेपण करण्यास आयोगाने परवानगी दिली असून कुठलेही रेकॉर्डेड प्रोग्राम या टेलिव्हीजनवरुन दाखवू नका, असे आयोगाने सांगितले आहे. 

निवडणूक आयोगाने राज्य मुख्य निवडणूक आयोगाला याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. नमो टीव्हीवर निवडणूक काळात फक्त लाईव्ह प्रोग्रामच प्रक्षेपित करता येतील, असे आयोगाने म्हटले आहे. प्रि-रेकॉर्ड केलेले कुठलेही प्रोग्राम दाखविण्यास मनाई करण्यात आली आहे. मीडिया कमिटीने प्रमाणपत्र दिल्याशिवाय नमो टीव्हीवरून कोणत्याही कार्यक्रमांचे प्रक्षेपण न करण्याची ताकीद दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपला दिली होती. या संदर्भात एक पत्र भाजपला पाठविण्यात आले होते. तसेच, या टीव्हीच्या कार्यक्रमांवर नजर ठेवण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नेमणूकही केली आहे. नमो टीव्ही हा नमो अ‍ॅपचा भाग असल्याचा खुलासा भाजपाने निवडणूक आयोगाकडे केला होता. काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने याबाबतचा अहवाल मागविला होता. तसेच नमो टीव्हीवर प्रमाणपत्राशिवाय असलेला सर्व मजकूर तत्काळ हटविण्याचे आदेश दिले होते.

नमो टीव्ही हा आमच्याच नमो अ‍ॅपचा भाग असून, त्याचे प्रक्षेपण टेलीकास्ट न करता वेबकास्ट केले जाते, असे भाजपने मान्य केले आहे. मात्र, नमो टीव्हीवर दाखवली जाणारी भाषणे व मुलाखती यांच्यासाठी पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच नमो टीव्हीच्या लोगोसाठी संमती घेण्यात आली होती, त्यावर कोणताही कार्यक्रम, भाषणे मुलाखती दाखवण्यासाठी आमची संमती घेण्यात आलेली नाही, असे निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नमो टीव्हीवरील कार्यक्रम हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याची तक्रार काँग्रेस व आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने बुधवारी काढलेल्या आदेशानुसार नमो टीव्ही दाखवणे गैर होते. तरीही आम्ही कार्यक्रम टेलीकास्ट नव्हे, तर वेबकास्ट करतो आणि त्यासाठी आम्ही स्लॉट विकत घेतला आहे, असा दावा भाजपने केला होता. त्यानुसार, आता केवळ लाईव्ह प्रक्षेपणास परवानगी देण्यात आली आहे.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा