शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला जाहिरात थांबविण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 10:09 IST

काँग्रेसच्या या जाहिरातीबाबत भाजपने आक्षेप नोंदवत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राजस्थानमधील मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना, निवडणूक आयोगाने काँग्रेसला मिस्ड कॉलसंदर्भातील जाहिरात थांबविण्याचे आदेश दिले, तसेच त्यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या आवाजात काँग्रेस पक्षाची ७ आश्वासने मतदारापर्यंत पोहोचवली जात होती.

काँग्रेसच्या या जाहिरातीबाबत भाजपने आक्षेप नोंदवत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि माजी मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आयोगात धाव घेतली होती. ही जाहिरात आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले होते.

‘व्होट फ्रॉम होम’ तेलंगणात सुरू

हैदराबाद : तेलंगणातील ३३ पैकी बहुतांश जिल्ह्यांमध्ये वरिष्ठ नागरिक, दिव्यांग यांना ‘घरीच मतदान’ ही प्रक्रिया सुरू झाली असून, ती २६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) विकास राज यांनी जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, “२१ नोव्हेंबरपासून बहुतांश जिल्ह्यांमध्ये घरपोच मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. इतर सर्व जिल्ह्यांमध्येही ती सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून, ती २६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल.

तेलंगणामध्ये प्रथमच, ८० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना, तसेच दिव्यांगांना (त्यांची इच्छा असल्यास) घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक