शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 16:36 IST

Election Commission of India: लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना एका निवडणूक आयुक्तांनी राजीनामा  दिल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील समितीने तातडीची बैठक घेऊन दोन नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली होती.

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना एका निवडणूक आयुक्तांनी राजीनामा  दिल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील समितीने तातडीची बैठक घेऊन दोन नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली होती. दरम्यान, या नव्या निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. या संदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने दोन नव्या निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला स्थगिती देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, कारण असं केल्यास अंधाधुंदी निर्माण होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  

फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयुक्त अनूपचंद्र  पांडे हे निवृत्त झाले होते. तर निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी ८ मार्च रोजी अचानक राजीनामा दिला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर सरकारने तातडीने पावलं उचलली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील समितीची बैठक होऊन ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. दरम्यान, या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना या दोन्ही निवडणूक आयुक्तांविरोधात कुठलेही आरोप नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकरणात आम्ही हस्तक्षेप करणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. निवडणुका तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत आम्ही हस्तक्षेप केला, तर अंदाधुंदी निर्माण होऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

मात्र याचिका फेटाळून लावण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. केवळ दोन तासांमध्ये २०० लोकांची छाननी कशी काय झाली, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने सरकारला विचारला होता. विरोधी पक्ष नेत्यांना आणखी वेळ दिला गेला पाहिजे होता का, असा प्रश्न न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी एसजींना विचारला. २०० नावांची छाननी करण्यासाठी केवळ दोन तास दिले गेले, पारदर्शकता केवळ अजून चालत नाही तर ती दाखवली गेली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावले होते.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४