शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
4
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
5
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
6
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
7
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
8
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
9
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
10
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
11
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
12
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
13
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
14
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
15
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
16
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
17
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
18
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
19
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
20
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर

देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 17:55 IST

Election Commission of India SIR :उद्यापासून देशभरात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया सुरू; मुख्य निवडणूक आयुक्तांची घोषणा.

Election Commission of India SIR : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज(दि.27) देशभरात मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी विशेष सखोल पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली. SIR चा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह 12 राज्यांमध्ये SIR राबवले जाणार आहे. 

2004 नंतर पहिल्यांदाच देशव्यापी SIR

ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आत्तापर्यंत देशात 8 वेळा SIR पार पडला आहे. 2002 ते 2004 दरम्यान शेवटचे SIR राबवण्यात आले होते. त्यानंतर अनेक राजकीय पक्षांकडून मतदार याद्यांतील त्रुटींविषयी आयोगाकडे तक्रारी येत होत्या. आता जवळपास दोन दशकांनंतर पुन्हा राष्ट्रीय स्तरावर ही प्रक्रिया सुरू होत आहे. 

SIR का आवश्यक आहे? आयोगाने सांगितले चार प्रमुख कारण

मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, मतदार यादीतील अचूकता आणि पारदर्शकता राखण्यासाठी ही प्रक्रिया अत्यावश्यक आहे. त्यामागची चार मुख्य कारणे अशी आहेत:

1- लोकसंख्येचे स्थलांतर : मोठ्या प्रमाणात लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करतात, त्यामुळे मतदाराची नावे दोन ठिकाणी नोंदली जातात.2- दुहेरी नोंदी : एकाच मतदाराचे नाव जुन्या आणि नव्या दोन्ही ठिकाणी राहते.3- मृत मतदारांची नावे: काही वेळा मतदाराच्या मृत्यूनंतरही त्याचे नाव यादीतून वगळले जात नाही.4- परदेशी नागरिकांची नोंद: काही ठिकाणी चुकून विदेशी नागरिकांचे नाव मतदार यादीत दिसते.

बिहारमध्ये पहिला टप्पा यशस्वी

मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, SIR चा पहिला टप्पा बिहारमध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. या प्रक्रियेत सुमारे 7.5 कोटी मतदारांनी सहभाग घेतला, आणि ती शून्य अपील सह संपन्न झाली. आता ज्या राज्यांमध्ये पुढील टप्पे पार पडणार आहेत, त्या ठिकाणची मतदार यादी आज रात्रीपासून फ्रीझ करण्यात येणार आहे.

या 12 राज्यांमध्ये SIR राबवले जाणार

  1. अंडमान आणि निकोबार
  2. छत्तीसगड
  3. गोवा
  4. गुजरात
  5. केरळ
  6. लक्षद्वीप
  7. मध्य प्रदेश
  8. पुदुच्चेरी
  9. राजस्थान
  10. तामिळनाडू
  11. उत्तर प्रदेश
  12. पश्चिम बंगाल

 

असे आहे SIR च्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक

क्र.टप्पा / प्रक्रियादिनांक
1️⃣छपाई व प्रशिक्षण (Printing / Training) 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025
2️⃣घरोघरी जाऊन मतदार गणना (House to House Enumeration Phase) 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2025
3️⃣मतदार यादी प्रकाशन (Publication of Draft Electoral Rolls) 9 डिसेंबर 2025
4️⃣दावे व आक्षेप कालावधी (Claims & Objection Period) 9 डिसेंबर 2025 ते 8 जानेवारी 2026
5️⃣नोटीस टप्पा (सुनावणी व पडताळणी) (Notice Phase – Hearing & Verification) 9 डिसेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026
6️⃣अंतिम मतदार यादी प्रकाशन (Publication of Final Electoral Rolls) 7 फेब्रुवारी 2026
English
हिंदी सारांश
Web Title : Nationwide voter list review needed: Election Commission explains SIR importance.

Web Summary : Election Commission announces second phase of Special Intensive Revision (SIR) across 12 states to enhance voter list accuracy. Aim: address migration, duplicate entries, deceased voters, and foreign nationals' inclusion. First phase completed in Bihar.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगUttar Pradeshउत्तर प्रदेशwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूक 2024Biharबिहार