नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका महिलेने दोनदा मतदान केल्याचा आरोप कोणत्या कागदपत्रांच्या आधारे केला? हे स्पष्ट करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी रविवारी नोटीस पाठवली आहे.
राहुल गांधींनी कागदपत्रे दिल्यास कार्यालयाला सविस्तर चौकशी करण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांनी नोटिशीत म्हटले आहे.
राहुल गांधींनी दाखवलेला 'टिकमार्क' असलेला कागद मतदान अधिकाऱ्याने जारी केलेलाच नव्हता, असे निवडणूक कार्यालयाच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे आपण शकुन राणी किंवा इतर कुणी दोनदा मतदान केले आहे, असा निष्कर्ष काढण्यासाठी वापरलेली संबंधित कागदपत्रे सादर करावीत, जेणेकरून या कार्यालयाकडून सविस्तर चौकशी करता येईल, असे नोटिशीत म्हटले आहे.