शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

'नीती'ला निवडणूक आयोगाची नोटीस; काँग्रेसचा टाळे ठोकण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 22:02 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक अजेंड्यावर आज भाष्य केले. यावेळी त्यांनी या अजेंड्यामध्ये योजना एका व्यक्तीची नाही, तर जनतेचा आवाज असणार असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी किमान उत्पन्न योजना जाहीर करत निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. मात्र, यावर नीती आयोगाने केलेल्या टीकेविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यावर आयोगाने नीती आयोगाला नोटीस पाठविली आहे. तर राहुल गांधी यांनी ही न्याय योजना जनतेचा आवाज असून सत्तेत आल्यानंतर नीती आयोगावाच टाळे ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक अजेंड्यावर आज भाष्य केले. यावेळी त्यांनी या अजेंड्यामध्ये योजना एका व्यक्तीची नाही, तर जनतेचा आवाज असणार असल्याचे सांगितले. यामध्ये रोजगाराभिमुख, शेती संकट दूर करण्यासाठी तसेच आरोग्य, शिक्षणासह अर्थव्यवस्था मजबूत करण्यासंबंधी घोषणा असणार असल्याचे सांगितले. तसेच न्याय योजनेवर टीका करणाऱ्या नीती आयोगालाही सत्तेत आल्यास बंद करणार असल्याचे ते म्हणाले.

तर दुसरीकडे काँग्रेसवर टीका करणाऱ्या नीती आयोगाच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली असून राजीव कुमार यांनी देशाबाहेर असल्याने यासाठी 5 एप्रिलपर्यंतचा वेळ मागितला आहे. 

राहुल गांधी हे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी उद्योजकांना कर दहशतवादातूनही मुक्त करणार असल्याचे सांगितले. 

राहुल गांधी यांनी ट्विट करत सत्तेत आल्यानंतर नीती आयोगाला बंद करण्यात येईल. या बदल्यात योजना आयोगाला आणण्यात येईल, ज्यामध्ये प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, विशेषज्ञ असतील. यांची संख्या 100 पेक्षा कमी असेल. नीती आयोगाकडे कोणतेही काम नाही. यामुळे ते सरकारच्या प्रचारासाठी खोटी आकडेवारी देत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना आयोग बंद करून नीती आयोग सुरु केला होता. 

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक