शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींकडून राजीव गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, निवडणूक आयोगाने स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 09:46 IST

काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाचा मुद्दा घेऊन लोकसभा निवडणुकीचे पुढचे दोन टप्पे लढून दाखवावे,

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याबद्दल काँग्रसने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य आचारसंहिता भंग करणारे असल्याचे सांगत, काँग्रेस नेत्या यांनी तक्रार केली होती. तसेच, याबाबत मोदींवर कारवाई करण्याचीही मागणी केली होती. 

काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाचा मुद्दा घेऊन लोकसभा निवडणुकीचे पुढचे दोन टप्पे लढून दाखवावे, असे खुले आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील चायबासा येथील जाहीर सभेत दिले होते. तत्पूर्वी, मोदींनी 'राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर वन' असा आरोप केल्याने मोठे वादळ उठले आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मोदींवर कठोर शब्दांत प्रहार केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसचे सॅम पित्रोदा यांनी पंतप्रधानांच्या विधानाचा तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज चायबासा येथील सभेतून पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. त्यानंतर काँग्रेसच्यावतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान पदावर असताना, त्यांनी अशी भाषा वापरणे चुकीचे असल्याचे काँग्रने तक्रारीत म्हटले होते. तसेच, मोदींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली होती. मात्र, आयोगाने याबाबत मोदींना क्लीन चीट दिली आहे. मोदींच्या भाषणातून आचारसंहिता भंग झाल्याचे कुठेही आढळून आले नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आम आदमी पक्षानेही नरेंद्र मोदींविरुद्ध निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली होती. पंतप्रधान मोदींच्या एका भाषणात भारतीय लष्कराचा उल्लेख राजकीय लाभासाठी करण्यात आल्याचा आरोप आपने केला होता. मात्र, निवडणूक आयोगाने त्यामध्येही मोदींना क्लीन चीट दिली होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग