शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बिग ब्रेकिंग! वयाच्या १७ वर्षानंतर बनवा मतदार ओळखपत्र; निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 13:17 IST

आता नव्या मतदारांना १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबरपासून मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज भरता येऊ शकतो.

नवी दिल्ली - मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आता वयाची १८ वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार नाही कारण निवडणूक आयोगाने याबाबत नवीन निर्देश दिले आहेत. आता १७ वर्षावरील युवक-युवतींना यादीत आगाऊ अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. मतदार नोंदणीबाबत तांत्रिक बाबी दूर करण्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी सर्व राज्यातील निवडणूक आयोगांना आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, आता मतदार यादीत नोंदवण्यासाठी १ जानेवारीला वयाची १८ वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार नाही. तरूण १७ वर्षापेक्षा अधिक असतील तर त्यांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज भरावा लागेल. आता नव्या मतदारांना १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबरपासून मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज भरता येऊ शकतो. प्रत्येक तिमाहीला मतदार यादी अपडेट केली जाईल. यातील पात्र मतदारांना पुढच्या तिमाहीत वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर मतदान करता येईल. 

तसेच नोंदणी झाल्यानंतर नव मतदारांना निवडणूक आयोगाचं ओळखपत्र जारी केले जाईल. मतदार यादी २०२३ मध्ये त्यात बदल केले जातील. कुठलाही नागरिक १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत १८ वर्ष पूर्ण होतील त्याची नव्या मतदार यादीत नाव समाविष्ट असेल. अलीकडेच आरपी अधिनियमात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी योग्यता वर्षातून तिनवेळा देण्यात येईल. याआधी केवळ १ जानेवारीची पात्रता तारीख मानली जात होती. 

त्याचसोबत आधार कार्डबाबत आयोगाने सांगितले की, आधार नंबर मतदार यादीशी जोडण्याबाबत नोंदणी फॉर्ममध्ये मतदारांसाठी तरतूद करण्यात आली आहे. सध्याच्या मतदारांसाठी आधार नंबर लिंक करावा यासाठी नवीन फॉर्म ६ ब आणला आहे. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी कुठल्याही अर्जाला नकार देण्यात येणार नाही. 

ऑनलाइन अर्जासाठी काय कराल?मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक मतदार त्याचा आधार क्रमांक अर्ज क्र. ६ ब मध्ये भरून देऊ शकतो. या अर्जाच्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध केल्या जातील. याशिवाय हा अर्ज क्र. ६ ब हा भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध होईल.अर्ज क्रमांक ६ द्वारे भरा महिती- नमुना अर्ज क्र. ६, ७ व ८ मध्ये १ ऑगस्टपासून सुधारणा करण्यात येत आहेत. नमुना ६ ब नव्याने तयार केला आहे. सुधारित अर्जानुसारच मतदारांनी मतदार यादीतील बदल अथवा नोंदणीची प्रक्रिया करावी. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगIndiaभारत