शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

UP Election 2022: म्हणून योगी आदित्यनाथ अयोध्या, मथुरेऐवजी गोरखपूरमधून निवडणूक लढवणार, समोर आलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 17:25 IST

Uttar Pradesh Assembly Election 2022: Yogi Adityanath हे विधानसभेची निवडणूक श्रीरामाची जन्मभूमी असलेली Ayodhya किंवा श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या Mathuraमधून लढवतील, अशी चर्चा होती. मात्र अखेरीस गुरू गोरखनाथांची भूमी असलेल्या Gorakhpur मधून ते निवडणूक लढवतील, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भाजपाने सर्व चर्चांना पूर्णविराम देत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गोरखपूर शहर मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. योगी आदित्यनाथ हे विधानसभेची निवडणूक श्रीरामाची जन्मभूमी असलेली अयोध्या किंवा श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेमधून लढवतील, अशी चर्चा होती. मात्र अखेरीस गुरू गोरखनाथांची भूमी असलेल्या गोरखपूरमधून ते निवडणूक लढवतील, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

योगी आदित्यनाथ यांना गोरखपूरमधून निवडणूक लढवण्याचे मुख्य कारण म्हणजे हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. १९६७ पासून येथे भाजपाचा कधीही पराभव झालेला नाही. गेल्या चार विधानसभा निवडणुकांमध्ये येथून भाजपाचे राधा मोहनदास अग्रवाल निवडून येत आहेत. मात्र यावेळी त्यांचे तिकीट कापण्यात आले आहे.

गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक लढवून गोरखपूर-बस्ती विभागातील ४१ जागांवर प्रभाव पाडण्याची भाजपाची रणनीती आहे. २०१७मध्ये भाजपाने येथील ४१ पैकी ३७ जागा जिंकल्या होत्या. गोरखपूर जिल्यातील नऊपैकी आठ मतदारसंघात भाजपचा विजय झाला होता. आता या विजयाची पुनरावृत्ती करण्याची जबाबदारी योगी आदित्यनाथ यांच्यावर असेल.

मात्र आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात तब्बल ४२ वेळा अयोध्येचा दौरा करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतून निवडणूक न लढवण्यामागेही एक मोठे कारण आहे. ते म्हणजे अयोध्येत सध्या सुरू असलेल्या विकास कामांबाबत लोकांच्या मनात नाराजी आहे. काही ठिकाणी जमीन अधिग्रहणावरून राग आहे तर कुठे दुकान रिकामे केल्यामुळे नाराजी आहे. अशा परिस्थितीत योगींनी अयोध्येतून निवडणूक लढवली असती तर त्यांना अनेक अडचणी आणि आव्हानाचा सामना करावा लागला असता.

तर उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी मथुरेचा मुद्दा समोर आणण्यात आला होता. त्यामुळे योगी मथुरेमधून निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. राज्यसभा खासदार हरनाथ  सिंह यादव यांनी योगींनी मथुरेमधून लढावे यासाठी पत्रही लिहिले होते. मात्र मथुरेमधून योगी आदित्यनाथ यांच्याऐवजी श्रीकांत शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मथुरा हा ब्राह्मण बहुल मतदारसंघ आहे. तसेच येथून काँग्रेसचे प्रदीप माथूर चारवेळा जिंकले होते. पण २०१७ मध्ये श्रीकांत शर्मा यांनी त्यांचा पराभव केला होता.

राजकीय तज्ज्ञांच्या मते अयोध्या किंवा मथुरेमधून निवडणूक लढवली असती तर योगी आदित्यनाथ यांना अधिक मेहनत घ्यावी लागली असती. पण गोरखपूरमधून योगींना निवडून येणे सोपे आहे. तसेच योगी येथून लढल्यास त्याचा प्रभाव हा गोरखपूर, कुशीनगर, महाराजगंज, देवरिया, संतकबीरनगरसह अनेक जिल्ह्यातील राजकीय समिकरणांवर पडणार आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२GorakhpurगोरखपूरBJPभाजपा