शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

UP Election 2022: अखिलेश यादव विष्णूचा अवतार, ते मुख्यमंत्री बनेपर्यंत अन्नप्राशन नाही करणार, या कुटुंबाने केला पण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 21:00 IST

Uttar Pradesh Assembly Election 2022: समाजवादी पक्षाच्या समर्थकांनी सपाचे प्रमुख अखिलेश यादव हे भगवान विष्णूंचा अवतार असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी भगवान विष्णूसोबत तुलना करत या कुटुंबाने Akhilesh Yadav यांच्या फोटोची पूजा सुरू केली आहे. काही महिलाही या पूजेमध्ये सहभागी होत आहेत.

लखनौ -  उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता रंगतदार होऊ लागली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपलाच विजय होणार असल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे पक्षाच्या समर्थकांनीही आपल्या नेत्यांच्या विजयासाठी वेगवेळ्या माध्यमातून पूजापाठ सुरू केले आहेत. असाच एक प्रकार बाराबंकी येथून समोर आला आहे. येथे समाजवादी पक्षाच्या समर्थकांनी आपल्या घरी अखिलेश यादव आणि मुलायमसिंग यादव यांचा फोटो देवघरात स्थापन करून पूजा सुरू केली. तसेच ही पूजा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत सुरू राहील, असं स्पष्ट केलं आहे.

हा संपूर्ण प्रकार उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातील कुर्सी विधानसभा मतदारसंघामधील काकरिया गावातील आहे. जिथे एका कुटुंबाने सपाचे प्रमुख अखिलेश यादव हे भगवान विष्णूंचा अवतार असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी भगवान विष्णूसोबत तुलना करत या कुटुंबाने अखिलेश यादव यांच्या फोटोची पूजा सुरू केली आहे. काही महिलाही या पूजेमध्ये सहभागी होत आहेत.

या लोकांच्या मते भगवान विष्णू अखिलेश यादव यांच्या रूपात कलियुगामध्ये अवतरीत झाले आहेत. तसेच निवडणुकीनंतर त्यांचं सरकार स्थापन होणं निश्चित आहे. जोपर्यंत त्यांचे सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत या घरात अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यांची पूजा सुरू राहणार असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये भगवान विष्णूचा अवतार असलेल्या अखिलेश यादव यांचे सरकार स्थापन होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, जोपर्यंत राज्यात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाचं सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत अन्नाचा त्याग करण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला आहे. जोपर्यंत अखिलेश यादव यांच सरकार येत नाही तोपर्यंत आम्ही अन्नग्रहण करणार नाही, केवळ फले खाऊन राहू, असे या कुटुंबातील महिलांनी सांगितले.   

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टी