UP ELECTION 2017 - वाराणसीत आठही जागांवर हर हर मोदी!
By Admin | Updated: March 11, 2017 16:00 IST2017-03-11T15:58:35+5:302017-03-11T16:00:49+5:30
संपूर्ण उत्तर प्रदेशात मोदीलाट आलेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या काशीमध्येही भाजपाला

UP ELECTION 2017 - वाराणसीत आठही जागांवर हर हर मोदी!
>ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 11 -संपूर्ण उत्तर प्रदेशात मोदीलाट आलेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या काशीमध्येही भाजपालादणदणीत विजय मिळाला आहे. वाराणसीमधील आठपैकी आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये आठ कमले उमलली आहेत.
लोकसभा निवडणुकीत बंपर यश मिळवणाऱ्या भाजपासमोर विधानसभा निवडणुकीत त्याच विजयाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान होते. तर आपल्या मतदारसंघातील सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवणे मोदींसाठी प्रतिष्ठेचे बनले होते. दरम्यान, अखेरच्या क्षणी कोणतीही कमतरता राहू नये म्हणून, मोदींनी तीन दिवस वाराणसीमध्ये ठाण मांडले होते.
अखेर आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये वाराणसी उत्तर येथून भाजपाचे रवींद्र जयस्वाल, वाराणसी दक्षिण येथून निळकंठ तिवारी, वाराणसी केंट येथून सौरभ श्रीवास्तव, रोहानिया येथून सुरेंद्र सिंग, अजगरा येथून कैलाशनाथ सोनकर आणि पिंडारा येथून अवधेश सिंग यांनी विजय मिळवला. सेवापुरी येथून अपना दल (एस)-भाजपा आघाडीचे नील रतन पटेल आणि शिवपूर येथून अनील राजभर विजयी झाले.