वयोवृद्ध अधिकाऱ्याची पत्नी दरोड्याला विरोध करताना ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 01:20 AM2020-06-22T01:20:35+5:302020-06-22T01:20:42+5:30

बी.आर. चावला (९४) हे यात जखमी झाले असून, त्यांची पत्नी कांता चावला (८८) या ठार झाल्या. या दाम्पत्याच्या दोन मुलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाल्यापासून ते दोघेच घरात राहायचे.

Elderly officer's wife killed while resisting robbery | वयोवृद्ध अधिकाऱ्याची पत्नी दरोड्याला विरोध करताना ठार

वयोवृद्ध अधिकाऱ्याची पत्नी दरोड्याला विरोध करताना ठार

Next

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयातील सेवानिवृत्त अधिकाºयाची वयोवृद्ध पत्नी दरोडेखोरांच्या हल्ल्यात मरण पावली, तर या अधिकाºयावर हल्ला झाला आहे.
नैर्ऋत्य दिल्लीतील सफदरगंज एन्क्लेव्हमध्ये शनिवारी ही हत्या झाल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. बी.आर. चावला (९४) हे यात जखमी झाले असून, त्यांची पत्नी कांता चावला (८८) या ठार झाल्या. या दाम्पत्याच्या दोन मुलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाल्यापासून ते दोघेच घरात राहायचे. दरोड्याचा प्रकार शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला. सुरक्षारक्षक म्हणून नुकतीच नियुक्ती झालेली व्यक्ती त्याच्या दोन-तीन सहकाऱ्यांसह चावलांच्या घरी आली, असे पोलीस म्हणाले. सुरक्षारक्षक आणि त्याच्यासोबतचे लोक चावलांच्या घरात घुसले व त्यांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन सोफ्यावर बसायला भाग पाडले. कांता यांनी दरोड्याला विरोध करायचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यापैकी एकाने धारदार शस्त्राने त्यांना भोसकले. त्या बेशुद्ध होऊन सोफ्यावर पडल्या. ते लोक त्यांच्या झोपायच्या खोलीत गेले व कपाटातील रोख रक्कम व दागिने घेऊन ते गेले. कांता सोफ्यावर पडलेल्या असताना त्यांचे पती कसेबसे घराबाहेर आले व त्यांनी शेजाºयांना सावध केले.
>सीसीटीव्ही कॅमेºयांतील तपासले फुटेज
कांता चावला यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले; परंतु तेथे त्यांचा मृत्यू झाला, असे पोलीस म्हणाले. गुन्हा दाखल झाला असून सीसीटीव्ही कॅमेºयांतील फुटेज तपासले जात आहे.

Web Title: Elderly officer's wife killed while resisting robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.