बिबटय़ाच्या हल्ल्यात वृद्ध जखमी
By Admin | Updated: October 19, 2014 02:29 IST2014-10-19T02:29:21+5:302014-10-19T02:29:21+5:30
बोंबडामळ-शिरवई येथे बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाला.

बिबटय़ाच्या हल्ल्यात वृद्ध जखमी
केपे : बोंबडामळ-शिरवई येथे बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाला. शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फासात अडकलेल्या बिबटय़ाने फिलीप वाझ या वृद्धावर हल्ला केला. बिबटय़ाला वन अधिका:यांनी पकडून नंतर त्याची बोंडला प्राणिसंग्रहालयात रवानगी करण्यात आली.
बोंबडामळ-शिरवई येथे भातशेतीची नासाडी केली जाते, म्हणून वन्यप्राण्यांसाठी अज्ञातांनी फास लावून ठेवले होते. त्यात शुक्रवारी रात्री बिबटा अडकला. शनिवारी सकाळी फिलीप त्या बाजूने जाताना फासात कोणीतरी अडकल्याचे पाहण्यासाठी गेले असता बिबटय़ाने हल्ला केला. यात त्यांच्या हाताला व चेह:यावर गंभीर दुखापत झाली. त्यांना पुढील उपचारासाठी काकोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर वनाधिका:यांना माहिती देण्यात आली. केपे वन खात्याचे आरएफओ मान्युएल फर्नाडिस यांनी सहका:यांसह घटनास्थळी धाव घेतली. मडगाव वन खात्याचे एएफसी नंदकुमार परब, म्हादई अभयारण्याचे आरएफओ परेश परब, तसेच बोंडलाचे वैद्यकीय पथक घटनास्थळी हजर झाले. बिबटय़ाला परेश परब यांनी बोंडला अभयारण्याच्या वैद्यकीय अधिकारी, मडगावचे प्राणिमित्र जुलिओ यांच्या मदतीने वनखात्यात आणले.
बिबटय़ा फासात अडकल्याचे ऐकून शेकडो लोकांनी बोंबडामळ येथे गर्दी केल्याने केपेचे पोलीस निरीक्षक प्रवीण गावस व त्यांच्या सहका:यांना लोकांना रोखण्यासाठी खूप धावपळ करावी लागली. (प्रतिनिधी)