शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अंधारात टॉर्च घेऊन ते धावले...; वृद्ध दाम्पत्यामुळे टळला रेल्वे अपघात, वाचला हजारो लोकांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 13:38 IST

वृद्ध दाम्पत्य तातडीने रेल्वे ट्रॅकवर पोहोचले आणि अपघात होण्यापासून थांबवला. यामुळे शेकडो लोकांचा जीव वाचला आहे.

तामिळनाडूतील एका वृद्ध दाम्पत्याच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा रेल्वेअपघात टळला आहे. भगवतीपुरम ते आर्यनकावू रेल्वे ट्रॅकवरील क्रॅश बॅरियरला धडकल्यानंतर ट्रक खाली पडला. काही वेळाने ट्रेन ट्रॅकवरून जाऊ लागते आणि याच दरम्यान शनमुगैया आणि कुरुनथम्मल यांनी ते पाहिलं. त्यानंतर दोघांनी ट्रॅकवरून धावत जाऊन टॉर्च दाखवत ट्रेन थांबवली.

द हिंदूने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, केरळहून प्लायवूड घेऊन जाणारा ट्रक तामिळनाडूतील थूथुकुडीला जात होता, मात्र वाटेत अचानक 12.50 वाजता तो रेल्वे ट्रकच्या वरून जाणाऱ्या रस्त्यावरून खाली पडला. हे पाहून वृद्ध दाम्पत्य तातडीने रेल्वे ट्रॅकवर पोहोचले आणि अपघात होण्यापासून थांबवला. यामुळे हजारो लोकांचा जीव वाचला आहे. या कारणामुळे लोक या वृद्ध जोडप्याचं खूप कौतुक करत आहेत.

'द हिंदू'शी बोलताना अधिकाऱ्याने सांगितलं की, ट्रेन 30 किलोमीटर प्रतितास वेगाने धावत होती. वृद्ध जोडप्याने आम्हाला इशारा केल्यावर आम्ही ट्रेन थांबवण्यात यशस्वी झालो. अपघातामुळे चेन्नई-एग्मोर कोल्लम एक्स्प्रेसला दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाला. 

हा अपघात अशा वेळी उघडकीस आला आहे जेव्हा रविवारी डिझेल इंजिनवर धावणारी मालगाडी जम्मू-काश्मीरमधील कठुआपासून पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील एका गावात चालक नसताना 70 किलोमीटरहून अधिक अंतर प्रवास करत होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 7:25 ते 9 च्या दरम्यान घडली, परंतु या काळात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात