शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

...तर सत्तासंघर्षाला कलाटणी मिळाली असती; शिंदे गटाच्या वकिलांच्या दाव्यानं चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 15:42 IST

२७ जूनला शिंदे गटाने अपात्रतेच्या नोटीसची कारवाई वाढवून द्यावी अशी मागणी केली होती. परंतु आमदारांना अपात्र करण्याबाबत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना थांबवले नव्हते

नवी दिल्ली - राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात ठाकरे-शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. सलग दुसऱ्यादिवशी हा युक्तिवाद सुरू आहे. शिंदे गटाच्या वतीने हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला त्यामुळे बहुमत चाचणीच झाली नाही असं त्यांनी कोर्टात सांगितले. जवळपास ४० मिनिटे हा युक्तिवाद कोर्टात साळवे यांनी केले. 

२७ जूनला शिंदे गटाने अपात्रतेच्या नोटीसची कारवाई वाढवून द्यावी अशी मागणी केली होती. परंतु आमदारांना अपात्र करण्याबाबत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना थांबवले नव्हते. त्यावेळी कारवाई केली नाही. बहुमत चाचणीच झाली नाही त्यामुळे नेमके काय घडले असते हे सांगता येत नाही. बहुदा या आमदारांनी त्यांच्या बाजूनेही मतदान केले असते असं एकप्रकारे शिंदे गटाने कोर्टात सांगितले. त्यामुळे या सत्तासंघर्षाला कलाटणी मिळाली असती अशी चर्चा सुरू झाली आहे. 

काल कपिल सिब्बल यांनी नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला देत फरक सांगितला होता. तर आज शिंदे गटाच्या वकिलांनी संपूर्ण घटनाक्रम कोर्टासमोर मांडला. सुनावणी पूर्ण होऊन आज कदाचित निर्णय घेऊ शकतात किंवा निर्णय राखून ठेवला जाऊ शकतो. परंतु आज केवळ हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार की नाही यावर निर्णय होईल. जर हे प्रकरण ७ न्यायाधीशांकडे गेले तर आणखी या प्रकरणाला वेळ लागेल आणि नाही गेले तर ही सुनावणी तशीच पुढे कायम राहील अशी माहिती वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली. 

काय झाला युक्तिवाद?शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी कोर्टात म्हटलं की, विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासाची नोटीस आल्यानंतर त्यांनी अपात्रतेची नोटीस काढणे योग्य आहे का? २०१६ मध्ये रेबिया प्रकरणात अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव असल्याचं त्यांना कारवाई करता येत नाही असा दाखला त्यांनी दिला. अध्यक्षांनी चुकीच्या पद्धतीने आमदाराला अपात्र ठरवलं तर केवळ आमदारावरच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघावर अन्याय होईल असं कौल यांनी कोर्टात सांगितले. अध्यक्षांचे अधिकार आणि इतर बाबींवर कौल यांनी कोर्टात युक्तिवाद मांडला. त्याचसोबत अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जातो त्याक्षणी अध्यक्ष पक्षपाती वागू शकतात. या स्थितीत अध्यक्षांनी अपात्रतेची कारवाई करू नये असं कौल म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय