शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
2
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
3
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
4
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
5
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
6
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
7
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
9
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
10
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
11
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
12
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
13
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
14
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
15
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
16
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
17
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
18
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
19
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
20
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन

एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 17:25 IST

नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

नवी दिल्ली - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महायुतीतील वाद चव्हाट्यावर येत आहेत. ठाणे, नवी मुंबई याठिकाणी भाजपा नेते उघडपणे स्वबळाची भाषा करत आहेत. दुसरीकडे मुंबईत भाजपाने १५० प्लसचा नारा दिला आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने विविध चर्चांना उधाण आले. या दौऱ्यात शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी महायुतीतील मतभेदावर भाष्य केले. शिंदे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्र आणि राज्यातील विविध विषयांवर आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. एनडीए आणि महायुतीचे गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे एकत्र कुटुंब आहे. नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ग्रासरूट लेव्हलच्या असतात. कार्यकर्त्यांना लढायची इच्छा असते, परंतु अंतिम निर्णय हा वरिष्ठ नेतृत्व घेत असते. निर्णय झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी शिस्त पाळावी. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद होऊ नयेत. मिठाचा खडा पडू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. त्यासोबतच पुण्यातील शिंदेसेना नेते रवींद्र धंगेकर आणि भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांच्यातील वादावर भाष्य करताना धंगेकरांना मी स्पष्ट संदेश दिला आहे, आवश्यक असल्यास मी स्वतः  त्यांच्याशी बोलेन असं शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, बिहारमधील निवडणुकीत एनडीएचा बहुमताने विजय होईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. सोबतच मुंबई, ठाणे आणि एमएमआरडीए क्षेत्रातील बिहारी बांधवांसोबत बैठका सुरू असून सर्वजण कामाला लागलेत. मोदी यांनी बिहारच्या विकासासाठी मोठा निधी दिला आहे. त्यामुळे तिथे एनडीएला बहुमत मिळेल असं एकनाथ शिंदे यांनी दावा केला. 

'त्या' दोषींवर कठोर कारवाई होईल

साताऱ्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचारप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. एका आरोपीला अटक झाली असून इतरांना लवकरच अटक होईल. दोषींना कोणत्याही प्रकारे पाठीशी घातले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Eknath Shinde Meets Modi Amidst Alliance Tensions Before Local Elections

Web Summary : Eknath Shinde met PM Modi, addressing alliance rifts before local elections. He emphasized unity within the NDA and Mahayuti, urging collective action and coordination. Shinde also addressed a dispute between party leaders in Pune and condemned the assault on a female doctor in Satara, promising strict action.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीShiv Senaशिवसेना