धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं, मी पाहतो; उदयनराजेंचा गर्भित इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 07:21 PM2022-06-24T19:21:41+5:302022-06-24T19:22:38+5:30

महाविकास आघाडीसोबत राहायचं ठरवलं तर शेवटचे १८ महिने राहिले. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना तुम्ही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत एकजुटीने काम करा असं म्हणायचं का? ही बंडखोरी झाली कशामुळे? याचा विचार करा असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

Eknath Shinde Revolt: udayanraje bhosale reaction Shiv Sena Rebel mla | धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं, मी पाहतो; उदयनराजेंचा गर्भित इशारा

धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं, मी पाहतो; उदयनराजेंचा गर्भित इशारा

googlenewsNext

दिल्ली - मला कुणाचं नाव घेऊन मोठं करायचं नाही. बेताल वक्तव्य करणारे कोण हे सगळ्यांना माहिती आहे. हे सरकार पडणार आहे, हा आकड्यांचा खेळ आहे. ज्यांच्याकडे बहुमत ते सरकारमध्ये राहतील. धमकीला कुणी घाबरत नाही. जे धमकी देतील त्यांनी माझ्याकडे यावं मी पाहतो असा गर्भित इशारा खासदार उदयनराजे यांनी दिला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, निवडून आलेले तुमच्या आमदारांना विचारात घेऊन निर्णय घेतला असता तर ही आघाडी कधीच झाली नसती. काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे. ही आघाडी फारकाळ टिकणार नाही. केवळ सत्तास्थापनेसाठी ही आघाडी झाली. भाजपा-शिवसेना आमदारांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादी होते. त्यामुळे आमदार, खासदारांना निर्णय घ्यावाच लागणार होता अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर दिली आहे. 

तसेच महाविकास आघाडीसोबत राहायचं ठरवलं तर शेवटचे १८ महिने राहिले. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना तुम्ही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत एकजुटीने काम करा असं म्हणायचं का? ही बंडखोरी झाली कशामुळे? त्यांना विचारात घेतले असते तर ही आघाडी आणि बंडखोरी झालीच नसती. या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्ती शिवरायांच्या विचाराची वारस आहे. परकीय आक्रमणाला कुणी भीक घातली नाही. कुणीतरी फुटकळ बेताल वक्तव्य करतायेत ते धमक्यांची भाषा करत असतील त्याला भीक घालणार नाही. जे कुणी धमकी देत आहेत त्यांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात उदयनराजे यांनी शिंदे यांना धमकी देणाऱ्यांना इशारा दिला आहे. 

हा तर रडीचा डाव - एकनाथ शिंदे
जे अल्पमतात त्यांनी नोटीस पाठवणं म्हणजे रडीचा डाव अशा शब्दात बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी  शिवसेनेला टोला लगावला आहे. शिंदे गटाची बैठक होणार असून या बैठकीत चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. काही अपक्ष आमदारही आहेत. पुढची रणनीती बैठकीत ठरेल. बैठकीनंतर पुढचे सर्व निर्णय घेतले जातील. लोकशाहीत कायद्याला, घटनेला आणि नियमाला महत्त्व आहे. जे अल्पमतात आहेत त्यांनी अशाप्रकारे नोटिसा पाठवणे हे हास्यास्पद आहे. रडीचा डाव आहे. अपात्र करण्याचा अधिकार तुमच्याकडे नाही. कायद्यानुसार ते शक्य नाही असा टोला शिंदेंनी लगावला आहे. 

तसेच आमदारांसोबत चर्चा केल्यानंतर रणनीती ठरवू. नियमानुसार लोकशाहीनुसार पावले उचलली जातील. कितीही नोटीस पाठवल्या तरीही घाबरणार नाही. घाबरतंय कोण? विधानसभेत ज्या नियमानुसार गोष्टी आहेत त्या कराव्याच लागतील. गटनेते नेमले आहेत ते पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे ४० हून जास्त आणि १२ अपक्ष अशाप्रकारे संख्याबळ ५० आमदारांच्या पुढे गेले आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.  

Web Title: Eknath Shinde Revolt: udayanraje bhosale reaction Shiv Sena Rebel mla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.