शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे-ठाकरेंच्या याचिकांनीच गोंधळ वाढवला; घटनापीठात नेमके काय काय होणार? तिढा सोडविणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 13:36 IST

एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटापैकी शिवसेना नेमकी कुणाची? आणि बंडखोर आमदारांच्या अपत्रातेच्या याचिकांवर नेमका कोणता निर्णय द्यायचा ते आता पाच न्यायमूर्तींचा समावेश असलेलं घटनापीठ ठरवणार आहे.

नवी दिल्ली-

Eknath Shinde Vs. Shiv Sena: एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटापैकी शिवसेना नेमकी कुणाची? आणि बंडखोर आमदारांच्या अपत्रातेच्या याचिकांवर नेमका कोणता निर्णय द्यायचा ते आता पाच न्यायमूर्तींचा समावेश असलेलं घटनापीठ ठरवणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश रमण्णा यांनी याप्रकरणाची तातडीनं सुनावणी घेत हे संपूर्ण प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचं ऐतिहासिक प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग करण्यात आल्यामुळे या घटनापीठात नेमकं काय काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

मोठी घडामोड! शिंदे-ठाकरे वाद घटनापीठाकडे वर्ग; गुरुवारी सुनावणी

सरन्यायाधीशांनी आज ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या सर्व याचिका घटनापीठाकडे वर्ग करताना निवडणूक आयोगालाही परवा होणाऱ्या सुनावणीपर्यंत कोणताही निकाल देऊ नका असेही आदेश दिले आहेत. घटनापीठात एकूण पाच न्यायमूर्तींचा समावेश असणार आहे. नेमकं कोणकोणत्या न्यायमूर्तींचा समावेश असेल हे देखील सरन्यायाधीश रमण्णा ठरवणार आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत विविध मुद्द्यांवर वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिका वेगवेगळ्या करुन त्यावर रितसर सुनावणी घटनापीठाकडे होईल.

घटनापीठात नेमकं काय काय होणार?>> घटनापीठाकडे प्रकरण वर्ग झाल्यावर दोन्ही गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिका वेगवेगळ्या करण्यात येतील.>> कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जावी हे देखील सरन्यायाधीश रमण्णा घटनापीठाला सूचित करतील. >>शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्हावर निवडणूक आयोग निर्णय घेईल>> विधानसभा उपाध्यक्षांवर अपात्रतेची याचिका होती, मग ते अपात्रतेचा निर्णय देऊ शकतात का? हे घटनापीठ ठरवेल.>> राज्यपालांची कृती योग्य ठरवली तर एकनाथ शिंदेंवर आपात्रतेची याचिका आहे त्यावर कोण निर्णय घेणार यावरही कोर्ट निकाल देण्याची शक्यता आहे.

कोर्टात आज काय घडलं?सर्वोच्च न्यायालयाने शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले आहे. याबाबत गुरुवारी सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या वेगवेगळ्या याचिका वेगळ्या केल्या जाणार आहेत. एकमेकांत गुंतागुंत वाढल्याने हे घटनापीठ महत्वाचे निर्णय घेईल व निवडणूक आयोगाची देखील जबाबदारी निश्चित करेल.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv Senaशिवसेना