विवाहानंतर आठवर्षांनी माहेरी आलेल्या मुलीला गावासमोर जिवंत जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 12:41 IST2016-03-06T12:33:11+5:302016-03-06T12:41:38+5:30

विवाहानंतर तब्बल आठ वर्षांनी माहेरी आलेल्या मुलीला घरातील सदस्यांनी संपूर्ण गावासमोर जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना राजस्थानातील डूंगपूर जिल्ह्यात घडली आहे.

Eight years after the marriage, the girl who was pregnant was burnt alive before the village | विवाहानंतर आठवर्षांनी माहेरी आलेल्या मुलीला गावासमोर जिवंत जाळले

विवाहानंतर आठवर्षांनी माहेरी आलेल्या मुलीला गावासमोर जिवंत जाळले

ऑनलाइन लोकमत 

डुंगरपूर, दि. ६ - राजस्थानात हॉनर किलिंगची एका धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहानंतर तब्बल आठ वर्षांनी माहेरी आलेल्या मुलीला घरातील सदस्यांनी संपूर्ण गावासमोर जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना राजस्थानातील डूंगपूर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. 
आठवर्षापूर्वी या मुलीने घरातील सदस्यांच्या इच्छेच्या विरोधात जाऊन  दुस-या जातीतल्या मुलाशी विवाह केला होता. त्याचा राग अजूनही कुटुंबियांच्या मनात खदखत होता. आई-वडिल आणि कुटुंबिय मागच्या कटू आठवणी विसरल्या असतील आणि त्यांनी माफ केले असावे म्हणून ही मुलगी माहेरी आली होती. 
मात्र कुटुंबातील सदस्यांनी संपूर्ण गावासमोर या मुलीला जिंवत जाळले. शुक्रवारी चार मार्च रोजी ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी ३५ जणांविरोधात एफआयआर दाखल केला असून, सात जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये मुलीच्या वडिलांचा समावेश आहे. 

Web Title: Eight years after the marriage, the girl who was pregnant was burnt alive before the village