शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मुंबईत वॉटर टॅक्सीसाठी आठ मार्ग निश्चित; चाकरमान्यांचा होणार पर्यावरणपूरक व परवडणारा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 07:09 IST

जहाजबांधणी मंत्रालयाची योजना, केटा मरनची क्षमता ५० प्रवासी

टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : मुंबईवरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी जहाज बांधणी मंत्रालयाने दिलासा देणाऱ्या प्रयोगाची तयारी सुरू केली आहे. मुंबईतील उपनगरांना सागरी मार्गाने जोडून छोट्या जहाजांमधून प्रवासी वाहतूक करण्यासाठी आठ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर या मार्गांवरून वेगवेगळ्या भागात जाणारे छोटे जहाज (वॉटर टॅक्सी) चालवले जाईल. वॉटर टॅक्सी प्रकल्पासाठी ही ठिकाणे जहाजबांधणी मंत्रालयाने निश्चित केली आहेत.संकल्पना अशी आहेसागरी मार्गाचा दैनंदिन स्थानिक वाहतुकीसाठी फारसा वापर केला जात नाही. लोकलच मुंबईची जीवनवाहिनी आहे. आता मात्र लोकल कोरोनामुळे ठप्प झाली. लांबचा विचार करता सागरी मार्ग पर्याय ठरू शकेल म्हणून आर्थिकदृष्ट्या सोयीचे व पर्यावरणास बाधा न आणणारे दळणवळणाचे माध्यम म्हणून वॉटर टॅक्सीकडे पाहिले जाते.असा असेल प्रवासकेटा मरन, केबिन फेरी व पॅसेंजर क्राफ्ट अशा तीन प्रकारच्या वॉटर टॅक्सीतून प्रवासी वाहतूक केली जाईल. केटा मरनची क्षमता ५० प्रवासी तर इतर दोन्ही वॉटर टॅक्सीतून एका वेळी प्रत्येकी १४ जण प्रवास करू शकतील. सुरुवातीला पर्यटनवाढीचा विचार मात्र व्यावहारिक ठरल्यास नियमित प्रवासी वाहतूक सुरू केली जाईल. प्रयोगिक तत्त्वावर सकाळी साडेआठ, दुपारी दोन व सायंकाळी सात वाजता वॉटर टॅक्सी धावेल. दोन ठिकाणांमध्ये प्रवासासाठी किती वेळ लागतो, यावर या योजनेचे यश-अपयश ठरेल, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी अलीकडेच या प्रकल्पासाठी दिवसभराची बैठकही घेतली.असे आहेत ८ मार्ग

  1. ठाणे-दिवा-डोंबिवली-कल्याण
  2. ऐरोली-कोपरखैरणे-वाशी-नेरळ
  3. गेटवे-आयसीटी-डीसीटी- नेरळ
  4. गेटवे-वरळी- वांद्रे-जुहू
  5. जुहू-वर्सोवा-मालाड-बोरीवली
  6. बोरीवली-मीरा भाईंदर-वसई-विरार
  7. नेरळ-जेएनपीटी-कारंजे -रेवास आवरे -धरमतार
  8. विरार-वसई-मीरा भाईंदर-कोलशेत -पूर्व ठाणे

या मार्गांवर बोटीसाठी थांबे असतील. उदाहरणार्थ विरार ते ठाणे या मार्गावर विरारहून अर्नाला जेटी-वसई पाचू जेटी-मीरा भाईंदर जेटी-कावेसर/ पाटीलपाडा/ कासारवाडा कोलशेत-ठाणे पूर्व कळवा पारसिक बंदर असे थांबे असतील. असेच थांबे प्रत्येक मार्गावर निश्चित करण्यात आले आहेत.

टॅग्स :MumbaiमुंबईSea Routeसागरी महामार्गWaterपाणीTaxiटॅक्सी