शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोनं शोधण्यासाठी सेप्टिक टँकमध्ये आठ जणांना उतरवले, चौघांचा गुदमरून मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:58 IST

Jaipur Accident: राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील सीतारपुरा ज्वेलरी मार्केटमधील अचल जेम्स ज्वेलरी फॅक्टरीमधील सेप्टिक टँकच्या साफसफाईदरम्यान, चार मजुरांचा  गुदमरून मृत्यू झाला.

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील सीतारपुरा ज्वेलरी मार्केटमधील अचल जेम्स ज्वेलरी फॅक्टरीमधील सेप्टिक टँकच्या साफसफाईदरम्यान, चार मजुरांचा  गुदमरून मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. या दुर्घटनेत दोन मजूर बचावले आहेत. ज्वेलरी फॅक्टरीमध्ये दागिने तयार करत असताना सोन्याचे लहान तुकडे आणि कण बाहेर पडत असतात. तसेच हे कण पण्यासोबत सेप्टिक टँकमध्ये गोळा होता. त्यामुळे दर दोन महिन्यांनी टँकची सफाई करून त्यातील केमिकलयुक्त पाणी बाहेर काढून त्यामधून हे सोन्याचे कण गोळा केले जातात.

जेम्स ज्वेलरी फॅक्टरीमधील सेप्टिक टँकची साफसफाई करण्यासाठी मजुरांना टाकीमध्ये उतरवण्यात आले होते. मात्र टँकमध्ये साठलेल्या विषारी वायुच्या संपर्कात आल्याने हे मजुर बेशुद्ध पडले. आतमधून काहीच हालचाल होत नसल्याने काय झालं हे पाहण्यासाठी आणखी दोन मजूर आत उरतले. ते सुद्धा या गॅसच्या संपर्कात आले. या घटनेची माहिती मिळताच पोसील त्वरित घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी या मजुरांना बाहेर काढून महात्मा गांधी रुग्णालयात नेले.

रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी चार मजुरांना मृत घोषित केले. तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या टँकमध्ये विषारी वायू आणि कार्बन डाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणात असल्याने ही दुर्घटना घडली असावी, असे सांगण्यात येत आहे. तसेच या कामगारांना सुरक्षेसाठीची कुठलीही उपकरणे न पुरवता टँकमध्ये उतरवण्यात आले होते, असेही समोर आले आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानAccidentअपघात