विनापरवानगी झाडांची कत्तल आठ ते दहा वृक्ष : वन्यजीव संरक्षण संस्थेने रोखली वृक्षतोड
By Admin | Updated: February 5, 2016 00:33 IST2016-02-05T00:33:27+5:302016-02-05T00:33:27+5:30
जळगाव : महामार्गावरील एका हॉटेलच्या मागे डॉ. अर्जून भंगाळे यांच्या खुल्या जागेत आठ ते दहा झाडे गुरुवारी तोडण्यात आले. या वेळी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकार्यांनी धाव घेऊन इतर झाडांची कत्तल रोखली. या बाबत मात्र डॉ. भंगाळे यांनी आपल्याला माहिती नसल्याचे सांगून वृक्षतोडीचा इन्कार केला.

विनापरवानगी झाडांची कत्तल आठ ते दहा वृक्ष : वन्यजीव संरक्षण संस्थेने रोखली वृक्षतोड
ज गाव : महामार्गावरील एका हॉटेलच्या मागे डॉ. अर्जून भंगाळे यांच्या खुल्या जागेत आठ ते दहा झाडे गुरुवारी तोडण्यात आले. या वेळी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकार्यांनी धाव घेऊन इतर झाडांची कत्तल रोखली. या बाबत मात्र डॉ. भंगाळे यांनी आपल्याला माहिती नसल्याचे सांगून वृक्षतोडीचा इन्कार केला. महामार्गावरील कालिंका माता मंदिरापुढे एका हॉटेलच्यामागे सकाळी ११ वाजेच्या सुमारास वृक्षतोड होत असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष वासुदेव वाढे व त्यांच्या सहकार्यांना मिळाली. त्यावेळी त्यांनी तेथे धाव घेतली असता जेसीबीद्वारे शिसम, निंब, सुबाभूळ यांची आठ ते दहा झाडे मुळासकट तोडल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ इतर झाडांची तोड रोखली व याची विचारणा केली असता शिरसोली येथील जानकीराम पाटील या ठेकेदाराचे माणसे असून त्यांनी हे झाड तोडण्याचे सांगितले, असे तेथील मजुरांनी सांगितले. पदाधिकार्यांनी संबंधित ठेकेदाराला बोलविले व परवानगीबाबत विचारले असता कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत वाढे यांनी मनपाच्या वृक्ष अधिकार्यांना कळविले असता तेथे अभियंता अरविंद कोल्हे व त्यांचे सहकारी आले. तसेच माजी महापौर विष्णू भंगाळे हेदेखील तेथे पोहचले. त्यांनी मध्यस्थी करून येथे दुसरे झाडे लावण्यात येतील असे सांगितले. वाढे यांनी याबाबत वनविभागालाही माहिती दिली. आपण दुपारी येऊन पंचनामा करू असे मनपाच्या अधिकार्यांनी वाढे यांना सांगितले. कोट..आपण केवळ साफसफाई करण्यास सांगितले होत. वृक्ष तोडण्याचे माहीत नाही. याची माहिती घेतो. - डॉ. ए.जी. भंगाळे, प्लॉट मालक.