जयपूर - जगातील सुमारे आठ कोटी लोकांना एचआयव्हीची लागण झाली आहे, त्यापैकी चार कोटींहून अधिक लोक मरण पावले आहेत, अशी माहिती राजस्थान एड्स नियंत्रण सोसायटीचे माजी प्रकल्प संचालक आणि लैंगिक रोग विशेषज्ञ डॉ. दिनेश माथूर यांनी सांगितले.स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वीणा आचार्य म्हणाल्या की, जागतिक स्तरावर १२ लाख गर्भवती महिलांना एचआयव्हीची लागण झाली आहे. क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये एचआयव्हीचा प्रसार सामान्य आहे आणि १८ टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये एचआयव्ही-टीबी सहसंसर्गाचे निदान झाले आहे.हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र सिंग राव यांनी सांगितले की, वरील नमूद केलेले रक्तदाब आणि हृदयविकार हे एचआयव्हीबाधित प्रौढांपैकी १० ते ३० टक्क्यांहून अधिक व्यक्तींमध्ये दिसून येतात.
जगात आठ कोटी लोकांना एचआयव्ही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 06:08 IST