आठ सदस्य देणार राजीनामा

By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:21+5:302015-02-06T22:35:21+5:30

Eight members resign | आठ सदस्य देणार राजीनामा

आठ सदस्य देणार राजीनामा

> स्थायी समितीची आज बैठक : १ मार्चला मंजूर करणार
नागपूर :महापालिकेच्या विद्यमान स्थायी समिती सदस्यांपैकी आठ सदस्य शनिवारी समितीच्या बैठकीत राजीनामे देणार आहेत. तेे १ मार्च २०१५ रोजी मंजूर केले जातील.
राजीनामा देणाऱ्यांत नागपूर शहर विकास आघाडीच्या सदस्य पल्लवी श्यामकुळे, सुुषमा चौधरी, भावना ढाकणे, हरीश दिकोंडवार, सविता सांगोळे, बसपाचे सागर लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दुनेश्वर पेठे व शिवसेनेचे बंडू तळवेकर आदींचा यात समावेश आहे.
कार्यकाळ संपल्याने समितीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. यामुळे मनपातील सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक समितीवर वर्णी लावण्यासाठी सक्रिय झालेले आहेत. दरम्यान समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी राजीनामा दिलेला नाही. ते फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात राजीनामा देणार असल्याचे संकेत आहेत.(प्रतिनिधी)
चौकट...
स्पर्धेतील नगरसेवक
स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी विकास आघाडीतील अनेक नगरसेवक इच्छूक आहेत. यात आरोग्य समितीचे रमेश सिंगारे, कर संकलन समितीचे गिरीश देशमुख, चेतना टांक व सुनील अग्रवाल आदींच्या नावाची चर्चा आहे.
चौकट..
डेंग्यू तपासणी शुल्क ३५० रुपये
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात शहरात डेंग्यूचा प्रकोप होता. नियंत्रणासाठी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. यात डेंग्यू तपासणीसाठी ३५० शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तसेच हुडकेश्वर -नरसाळा भागातील पाणी पुरवठ्यासाठी ६.७३ कोटींची तरतूद आहे. याला बैठकीत मंजुरी मिळण्याची आशा आहे.

Web Title: Eight members resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.