बीडमध्ये आठ दुचाकी जाळल्या
By Admin | Updated: May 7, 2014 00:13 IST2014-05-06T20:57:51+5:302014-05-07T00:13:10+5:30
बीड : शहरातील अंबिका चौक व आनंदनगर भागात मंगळवारी पहाटे प्रत्येकी चार अशा एकूण आठ दुचाकी जाळण्यात आल्या़ याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

बीडमध्ये आठ दुचाकी जाळल्या
बीड : शहरातील अंबिका चौक व आनंदनगर भागात मंगळवारी पहाटे प्रत्येकी चार अशा एकूण आठ दुचाकी जाळण्यात आल्या़ याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
आनंदनगरात राजेंद्र बाबूराव लाटे यांची इमारत आहे़ इमारतीच्या आवारात लाटे यांच्यासह त्यांच्या भाडेकरुंची दुचाकी वाहने उभी असतात. सोमवारी रात्रीही ती होती़ बाबासाहेब सानप, रघूनाथ विडेकर, बंडू लाटे, प्रवीण वायकर यांच्या मालकीच्या या चारही दुचाकी होत्या़
दरम्यान, याचवेळी शहरातील अंबिका चौकातील अशोक कारभारी भोसले यांच्या इमारतीच्या आवरातील चार दुचाकीही पेटविण्यात आल्या़ भोसले यांच्यासह त्यांचे भाडेकरु दिगांबर गिरी, बालासाहेब माने, भागवत भूसारी यांच्या मालकीच्या या दुचाकी होत्या़ या आठही दुचाकींची किंंमत दोन लाख रुपये इतकी आहे़ तपास सुरु असल्याचे निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांनी सांगितले़
वाहनधारकांत भीती
बीडमध्ये एकाच रात्रीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहने पेटवून दिली़ यापूर्वीही शहरात असा प्रकार घडलेला आहे़ त्यामुळे रात्रीच्यावेळी पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या गाड्या सुरक्षित नाहीत, असे स्पष्ट झाले आहे़