फादर टॉम यांच्या सुटकेसाठी प्रयत्न - सुषमा स्वराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2016 23:47 IST2016-03-26T23:47:00+5:302016-03-26T23:47:00+5:30
गेल्या महिन्यात येमेनमध्ये दहशतवाद्यांच्या एका गटाने अपहरण केलेल्या फादरच्या सुटकेसाठी भारताचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी

फादर टॉम यांच्या सुटकेसाठी प्रयत्न - सुषमा स्वराज
नवी दिल्ली : गेल्या महिन्यात येमेनमध्ये दहशतवाद्यांच्या एका गटाने अपहरण केलेल्या फादरच्या सुटकेसाठी भारताचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी ही माहिती दिली.
दहशतवादी गटाने मूळ केरळचे रहिवासी असलेले भारतीय नागरिक फादर टॉम उजुन्नालील यांना ठार करण्याची योजना आखली असल्याचे वृत्त धडकल्यानंतर स्वराज यांनी उपरोक्त वक्तव्य केले आहे. इसिसच्या दहशतवाद्यांनी मदर टेरेसा यांच्या मिशनरीज आॅफ चॅरिटीतर्फे चालविण्यात येणाऱ्या एका धर्मार्थ संस्थेवर हल्ला केला त्यावेळी उजुन्नालील बेपत्ता झाले होते.